मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने

636 वचने · 252 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा शिष्यांना हा शास्त्रलेख आठवला: “तुझ्या मंदिराविषयीच्या ईर्षेने मला ग्रासून टाकले आहे.”

  2. आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’”

  3. संदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘त्या सर्वांना परमेश्वर शिकवतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून त्यांच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो.

  4. शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”

  5. त्यावर येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही ‘दैवते’ आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या नियमात लिहिले नाही काय?

  6. त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!” “इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”

  7. “सीयोनकन्ये भिऊ नको; पाहा, तुझा राजा येत आहे गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.”

  8. नेमके हेच भविष्य यशायाह संदेष्ट्याने वर्तविले होते, ते पूर्ण झाले: “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि प्रभूचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?”

  9. “म्हणून परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत आणि त्यांची हृदये कठोर केली होती, म्हणजे त्यांना डोळ्यांनी दिसू नये, किंवा अंतःकरणाने समजू नये, किंवा ते वळू नये—जेणे करून मी त्यांना बरे करेन.”

  10. यशायाहने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला.

  11. “मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.’ हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.

  12. ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’ असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे.

  13. ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.” यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला: “त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली, आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.” म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले.

  14. सैनिकांनी जे केले त्यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाले: “त्याच्या हाडांपैकी एकही हाड मोडले जाणार नाही,”

  15. आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”

  16. “यासाठी,” पेत्र म्हणाला, “स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे: “ ‘त्याचे ठिकाण ओसाड पडो; व त्यात कोणीही वस्ती न करो,’ आणि, “ ‘त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.’

  17. “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  18. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील.

  19. वर आकाशात व खाली पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन.

  20. प्रभूचा महान व गौरवी दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.

  21. आणि जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’

  22. दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.

  23. यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल,

  24. कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही.

  25. तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’