- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना १:१सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:
- गणना १:२सुमारे इ.स.पू. १४९०
“संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.
- गणना १:३सुमारे इ.स.पू. १४९०
तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी.
- गणना १:४सुमारे इ.स.पू. १४९०
प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.
- गणना १:५सुमारे इ.स.पू. १४९०
“तुम्हाला मदत करणार्या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;
- गणना १:६सुमारे इ.स.पू. १४९०
शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;
- गणना १:७सुमारे इ.स.पू. १४९०
यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;
- गणना १:८सुमारे इ.स.पू. १४९०
इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल;
- गणना १:९सुमारे इ.स.पू. १४९०
जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;
- गणना १:१०सुमारे इ.स.पू. १४९०
योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;
- गणना १:११सुमारे इ.स.पू. १४९०
बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;
- गणना १:१२सुमारे इ.स.पू. १४९०
दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;
- गणना १:१३सुमारे इ.स.पू. १४९०
आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;
- गणना १:१४सुमारे इ.स.पू. १४९०
गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;
- गणना १:१५सुमारे इ.स.पू. १४९०
नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”
- गणना १:१६सुमारे इ.स.पू. १४९०
हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.
- गणना १:१७सुमारे इ.स.पू. १४९०
मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले,
- गणना १:१८सुमारे इ.स.पू. १४९०
आणि दुसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली.
- गणना १:१९सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणेच सीनायच्या रानात त्याने त्यांची गणती केली:
- गणना १:२०सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएलचा पहिला पुत्र रऊबेनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे, सैन्यात सेवा करण्यास सक्षम असणाऱ्या सर्व पुरुषांची नावे, त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:२१सुमारे इ.स.पू. १४९०
रऊबेनाच्या गोत्रांची संख्या 46,500 होती.
- गणना १:२२सुमारे इ.स.पू. १४९०
शिमओनाच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष व जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंबानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:२३सुमारे इ.स.पू. १४९०
शिमओनाच्या गोत्रांची संख्या 59,300 होती.
- गणना १:२४सुमारे इ.स.पू. १४९०
गादच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:२५सुमारे इ.स.पू. १४९०
गाद गोत्रांची संख्या 45,650 होती.