मुख्य मजकुरावर जा

Eleazar

61 वचने · 7 कुटुंब सदस्य

Eleazar चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.

  2. अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला.

  3. “तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.

  4. मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील.

  5. अहरोन आणि त्याचे जिवंत राहिलेले पुत्र एलअज़ार आणि इथामारला मोशे म्हणाला, “खमिराशिवाय तयार केलेल्या अन्नार्पणातून उरलेले धान्यार्पण घेऊन याहवेहला अर्पण करा आणि ते तुम्ही वेदीजवळ बसून खावे, कारण ते परमपवित्र आहे.

  6. जेव्हा मोशेने पापार्पणाच्या बोकडाचा शोध घेतला, तेव्हा त्याला समजले की तो जाळून टाकण्यात आला आहे. तेव्हा अहरोनाचे बाकी असलेले पुत्र एलअज़ार व इथामार यांच्यावर तो संतापला.

  7. अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.

  8. नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.

  9. अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती.

  10. “दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.”

  11. “अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला अग्नीमधून सर्व धुपाटणी ओढून घेण्यास सांगावे. कारण ती पवित्र असून याहवेहला समर्पित केलेली आहेत. त्याचप्रमाणे त्याने तो जळका धूपही थोड्या अंतरावर विखरून टाकावा.

  12. त्याप्रमाणे एलअज़ार याजकाने ती दोनशे पन्नास कास्याची धुपाटणी घेतली आणि ती ठोकून वेदीला आच्छादन करण्याकरिता त्यांचा पत्रा तयार केला.

  13. ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा.

  14. त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे.

  15. अहरोन व त्याचा पुत्र एलअज़ार यांना घेऊन होर पर्वतावर जा.

  16. अहरोनाची वस्त्रे काढून ती त्याचा पुत्र एलअज़ारला घाल, कारण तो त्याच्या लोकांशी जाऊन मिळेल; तो तिथे मरण पावेल.”

  17. मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरविली आणि एलअज़ारावर चढविली आणि अहरोन त्या डोंगराच्या शिखरावर मरण पावला. नंतर मोशे आणि एलअज़ार डोंगरावरून खाली आले,

  18. जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला

  19. “अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने इस्राएलवरील माझा क्रोध शांत केला आहे. कारण लोकांमधील माझ्या सन्मानाविषयी मी जितका ईर्ष्यावान आहे तितकाच तो सुद्धा होता म्हणून मी माझ्या ईर्षेने त्यांचा नाश केला नाही.

  20. पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले,

  21. म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले,

  22. अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता.

  23. मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली.

  24. आणि त्या मोशे, एलअज़ार याजक, पुढारी व सर्व मंडळीसमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या राहिल्या व म्हणाल्या,

  25. एलअज़ार याजक व संपूर्ण मंडळीसमोर त्याला उभे करून त्यांच्या समक्षतेत त्याची नेमणूक कर.