मुख्य मजकुरावर जा

Eleazar

61 वचने · 7 कुटुंब सदस्य

Eleazar चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अम्रामाची संतती: अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र: नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.

  2. एलअज़ारास फिनहास, फिनहासास अबीशूवा,

  3. अहरोनाचे वंशज: अहरोनाचा पुत्र एलअज़ार, त्याचा पुत्र फिनहास, त्याचा पुत्र अबीशूवा,

  4. पूर्वीच्या काळी एलअज़ारचा पुत्र फिनहास या सर्वांवर द्वारपालांचा अधिकृत अधिकारी होता. याहवेहचे सानिध्य त्यांच्याबरोबर होते.

  5. अहरोनाच्या वंशजाची विभागणी: अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.

  6. नादाब व अबीहू हे अहरोनाचे पुत्र, ते अहरोना आधीच मृत्यू पावले होते. त्यांना पुत्र नव्हते; म्हणून याजकाचे कार्य एलअज़ार व इथामार हे करीत.

  7. दावीदाने एलअज़ाराचे वंशज सादोक व इथामाराचा वंशज अहीमेलेख यांच्या मदतीने अहरोनाच्या वंशजांची विभागणी केली व त्यांची क्रमानुसार सेवेसाठी नेमणूक केली.

  8. एलअज़ाराच्या वंशात इथामाराच्या वंशापेक्षा अधिक पुढारी होते आणि त्यांची त्यानुसार विभागणी करण्यात आली: एलअज़ाराच्या वंशातून सोळा कुटुंबप्रमुख आणि इथामाराच्या वंशातून आठ कुटुंबप्रमुख असे विभागण्यात आले.

  9. कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.

  10. लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.

  11. अबीशूवा फिनहासाचा पुत्र होता. फिनहास एलअज़ाराचा पुत्र होता. एलअज़ार अहरोनाचा पुत्र होता. अहरोन मुख्य याजक होता—