Priests बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
हंगामाचे वेळी काईनाने याहवेहला दान देण्यासाठी आपल्या जमिनीतील काही उत्पन्न आणले.
हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले,
मग नोआहने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशूतून काही घेतले आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले.
तिथून तो बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगराकडे गेला आणि जिथे पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय हे शहर होते, तिथे त्याने आपला तळ दिला. तिथेच त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि याहवेहच्या नावाने उपासना केली.
त्या ठिकाणी याकोबाने एक वेदी उभारली व त्या वेदीचे नाव त्याने एल बेथेल असे ठेवले; कारण तो एसावापासून पळून जात असता परमेश्वराने येथेच त्याला दर्शन दिले होते.
तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत.
गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगरूला कोकरू खंडणी म्हणून भरून सोडव, पण खंडणी भरून ते तू सोडविले नाहीस, तर त्याची मान मोड. मनुष्याच्या प्रत्येक नराला खंडणी भरून सोडव.
तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.”
याहवेहची सेवा करावयास जे याजक जवळ येतात त्यांनी सुद्धा स्वतःला पवित्र करावे, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”
याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.
शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा.
मग त्याने इस्राएलचे तरुण पुरुष पाठविले व त्यांनी याहवेहला होमार्पणे व गोर्हे अर्पून शांत्यर्पण केले.
“इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे.
सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”
ज्यांना अशा बाबतीत मी ज्ञान दिले आहे, त्या सर्व कुशल कारागिरांना सांग की अहरोनाच्या पवित्रीकरणासाठी त्यांनी वस्त्रे बनवावी, यासाठी की त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी.
अहरोनाच्या पुत्रांचा मान व आदर राखला जावा, म्हणून त्यांच्यासाठी झगे, कमरबंद व टोप्या बनवाव्या.
“शरीराला झाकावे म्हणून तागाच्या कापडाचे, कंबरेपासून मांडीपर्यंत पोहोचेल अशी अंतर्वस्त्रे तयार करावी.
अहरोन व त्याचे पुत्र ज्यावेळी सभामंडपात येतील किंवा सेवेसाठी वेदीकडे पवित्रस्थानात जातील, त्यावेळी त्यांनी ती वस्त्रे घालावी, म्हणजे ते दोषी ठरून मरणार नाहीत. “अहरोन व त्याच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.”
मग अहरोन व त्याच्या पुत्रांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणून त्यांना पाण्याने धुवावे;
त्याच्या पुत्रांनाही झगे घालावे.
त्यांना फेटे बांधावे. मग अहरोनास व त्याच्या पुत्रांना कमरपट्टे बांधावे. याप्रमाणे याजकत्व कायमचे त्यांचेच असणार. “मग तू अहरोन व त्याच्या मुलांना अभिषेक करावा.
“मग सभामंडपाच्या समोर गोर्हा आणावा व त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याच्या पुत्रांनी आपले हात ठेवावेत.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्हा वधावा.
गोर्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ आणि त्यांच्या चरबीसह दोन्ही गुरदे घेऊन ती वेदीवर जाळावी.