Priests बद्दल बायबलमधील वचने: Lasted seven days
Lasted seven days बद्दल वचने
“मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी तू करावे, त्यांच्या समर्पणास सात दिवस घ्यावे.
पापार्पण म्हणून दररोज तू एक गोर्हा प्रायश्चित्तासाठी अर्पण करावा. वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध करावी व ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा.
सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र करावी. मग वेदी परमपवित्र होईल व ज्या कशाचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.
मग सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही सभामंडपाच्या द्वाराबाहेर जाऊ नका, कारण तुमचा समर्पणविधी सात दिवसाचा आहे.