Skip to content

Ai

31 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Hai

31.9100, 35.2600 गूगल नकाशावर पाहा

Ai चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिथून तो बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगराकडे गेला आणि जिथे पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय हे शहर होते, तिथे त्याने आपला तळ दिला. तिथेच त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि याहवेहच्या नावाने उपासना केली.

  2. नंतर ते नेगेवहून बेथेलच्या रोखाने उत्तरेकडे गेले. बेथेल व आय यांच्यामध्ये त्यांनी पूर्वी तळ दिला होता

  3. यहोशुआने काही माणसे यरीहोकडून आयकडे पाठविली, जे बेथेलच्या पूर्वेकडे बेथ-आवेनजवळ आहे आणि त्यांना म्हणाला, “जा आणि त्या प्रदेशाला हेरा.” तेव्हा ती माणसे निघाली आणि त्यांनी आय शहर हेरले.

  4. जेव्हा ते यहोशुआकडे परत आले, त्यांनी सांगितले, “संपूर्ण सैन्याला आय विरुद्ध लढाई करण्यासाठी जावे लागणार नाही. ते जिंकण्यासाठी दोन ते तीन हजार माणसे पाठवा आणि संपूर्ण सैन्याला थकवू नका, कारण फक्त थोडेच लोक तिथे राहतात.”

  5. तेव्हा सुमारे तीन हजार हल्ला करून गेले; परंतु आयच्या लोकांनी त्यांचा पराभव केला.

  6. आयच्या लोकांनी त्यांच्यातील छत्तीसजणांना मारून टाकले. त्यांनी इस्राएली सैनिकांचा वेशीपुढे शबारीमपर्यंत पाठलाग केला; यामुळे लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून पाण्यासारखी झाली.

  7. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “भिऊ नकोस किंवा निराश होऊ नकोस; सर्व सैन्य बरोबर घे आणि आय शहरावर हल्ला कर, कारण जिंकून घेण्यासाठी मी आय शहराचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर व त्याची भूमी तुझ्या हाती दिली आहे.

  8. यरीहो शहर आणि त्याच्या राजाचे तू केलेस तसेच आय शहर आणि त्याच्या राजाचे कर; परंतु यावेळी हाती लागेल ती लूट व गुरे तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकाल. शहराच्या मागील बाजूस तुझ्या लोकांना दबा धरून बसव.”

  9. तेव्हा यहोशुआ आणि सर्व सैन्य आय नगरावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडले. त्याने सर्वोत्कृष्ट तीस हजार योद्धे निवडले आणि त्यांना रात्री पाठवून दिले,

  10. नंतर यहोशुआने त्यांना पाठवून दिले आणि ते आयच्या पश्चिमेकडे बेथेल आणि आयच्यामध्ये दबा धरून बसण्याच्या ठिकाणाकडे गेले आणि वाट पहात राहिले; परंतु यहोशुआने ती रात्र लोकांबरोबर घालविली.

  11. दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआने त्याच्या सैन्याला जमविले आणि तो आणि इस्राएलचे पुढारी त्यांच्यापुढे आयच्या दिशेने चालत निघाले.

  12. संपूर्ण सैन्यदल जे त्याच्याबरोबर होते ते निघाले आणि शहरापर्यंत पोहोचले आणि त्या शहरासमोर आले. त्यांनी आयच्या उत्तरेकडे छावणी उभी केली त्यांच्यामध्ये आणि आय शहराच्यामध्ये खोरे होते.

  13. यहोशुआने त्याच्याबरोबर सुमारे पाच हजार पुरुष घेतले आणि त्यांना बेथेल आणि आय शहराच्यामध्ये पश्चिमेकडे दबा धरून बसविले होते.

  14. जेव्हा आय शहराच्या राजाने हे पाहिले, तेव्हा तो आणि त्या शहराचे सर्व पुरुष पहाटेस घाई करून अराबासमोर एका विशिष्ट ठिकाणी इस्राएलशी युद्ध करण्यास निघाले. परंतु त्याला माहीत नव्हते की शहराच्या मागील बाजूस शत्रुसैन्य दबा धरून बसले आहे.

  15. आय शहरातील सर्व पुरुषांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी बोलाविण्यात आले. ते यहोशुआचा पाठलाग करीत शहरापासून लांब गेले.

  16. इस्राएली लोकांच्या मागे गेला नाही असा एकही पुरुष आय शहरात किंवा बेथेल येथे मागे राहिला नाही. त्यांनी आय शहराच्या वेशी उघड्याच टाकल्या आणि इस्राएलचा पाठलाग करण्यास गेले.

  17. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “तुझा भाला आय शहराकडे उंच कर कारण ते शहर मी तुझ्या हाती देणार आहे.” तेव्हा यहोशुआने त्याच्या हातात असलेला भाला त्या शहराच्या दिशेने उंच केला.

  18. आयच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांच्या शहरातून धूर निघून वर आकाशात जात आहे, परंतु आता कोणत्याही दिशेकडे पळून जाणे त्यांना शक्य नव्हते; जे इस्राएली लोक रानाकडे पळत चालले होते ते आता मागे वळून त्यांचा पाठलाग करणार्‍यांवर चालून आले.

  19. कारण जेव्हा यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की दबा धरून बसलेल्या सैन्याने शहराचा ताबा घेतला आहे आणि तिथून धूर निघून वर जात आहे तेव्हा ते मागे फिरले आणि त्यांनी आयच्या पुरुषांवर हल्ला केला.

  20. परंतु त्यांनी आय शहराच्या राजाला जिवंत ताब्यात घेतले आणि त्याला यहोशुआकडे आणले.

  21. आय नगरात राहणारे जे मैदानात आणि रानात त्यांचा पाठलाग करीत आले होते त्यांच्यातील प्रत्येकाला इस्राएलने तलवारीने मारून संपविल्यानंतर सर्व इस्राएली लोक आय शहराकडे परत आले आणि तिथे असलेल्या सर्व लोकांना त्यांनी मारून टाकले.

  22. आय शहराचे सर्व रहिवासी; जे पुरुष आणि स्त्रिया त्या दिवशी मारले गेले, त्यांची संख्या बारा हजार होती.

  23. कारण यहोशुआने आपल्या भाल्याचे टोक आय शहरातील सर्व लोकांचा नाश होईपर्यंत, मागे घेतले नाही.

  24. अशा रीतीने यहोशुआने आय शहर जाळून टाकले आणि ते नाश झालेल्या अवशेषांचा ढिगारा असे केले, आजपर्यंत ते ठिकाण असेच ओसाड पडलेले आहे.

  25. यहोशुआने आय शहराच्या राजाचे शव एका झाडाला टांगून ठेवले आणि संध्याकाळपर्यंत ते तसेच सोडून दिले. सूर्यास्ताच्या वेळेस यहोशुआने त्यांना हुकूम केला की, त्याचे शरीर झाडावरून काढा आणि ते खाली नगरवेशीच्या प्रवेशमार्गात फेकून द्यावे. नंतर त्यांनी त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास रचून ठेवली, ती आजपर्यंत राहिली आहे.