Skip to content

Strategy in War बद्दल बायबलमधील वचने

63 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्‍या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला.

  2. रात्रीच्या वेळी अब्रामाने युद्ध करण्यासाठी आपले सैन्य विभागले आणि त्याने या सैन्यावर यशस्वी हल्ला केला आणि त्याच्यापुढून पळून जाणार्‍या सैन्याचा त्याने दिमिष्काच्या उत्तरेकडे असलेल्या होबाह या शहरापर्यंत पाठलाग केला.

  3. हे ऐकताच याकोबाने भीतीने व व्याकूळ होऊन आपले कुटुंबीय, गुरे, शेरडेमेंढरे आणि उंट यांची दोन गटांमध्ये विभागणी केली.

  4. त्याने विचार केला, “एसावाने एका गटावर हल्ला केला तर दुसर्‍या गटाला कदाचित निसटून जाता येईल.”

  5. तेव्हा यहोशुआ आणि सर्व सैन्य आय नगरावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडले. त्याने सर्वोत्कृष्ट तीस हजार योद्धे निवडले आणि त्यांना रात्री पाठवून दिले,

  6. त्यांना आज्ञा दिली: “लक्षपूर्वक ऐका. शहराच्या मागील बाजूस तुम्ही दबा धरून बसावे. त्या ठिकाणापासून फार दूर जाऊ नका. तुम्ही सर्वजण सावध असा.

  7. मी आणि माझ्याबरोबर असलेले सर्वजण या नगरावर हल्ला करतील आणि जेव्हा त्यांनी आधी केल्याप्रमाणे ती माणसे बाहेर आमच्यावर चालून येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ.

  8. जोपर्यंत आम्ही त्यांना फसवून शहरापासून दूर घेऊन जाऊ, ते आमचा पाठलाग करतील. कारण ते म्हणतील, ‘आधी केले तसेच ते आमच्यापासून पळून जात आहेत.’ जेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ,

  9. तेव्हा तुम्ही दबा धरून बसलेले ठिकाण सोडून आय शहराचा ताबा घ्यावा. याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या हाती देतील.

  10. जेव्हा ते शहर तुम्ही हाती घ्याल, तेव्हा याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे तुम्ही त्या शहरास आग लावून द्यावी. लक्षात घ्या; तुम्हाला मी आज्ञा दिलेल्या आहेत.”

  11. नंतर यहोशुआने त्यांना पाठवून दिले आणि ते आयच्या पश्चिमेकडे बेथेल आणि आयच्यामध्ये दबा धरून बसण्याच्या ठिकाणाकडे गेले आणि वाट पहात राहिले; परंतु यहोशुआने ती रात्र लोकांबरोबर घालविली.

  12. दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआने त्याच्या सैन्याला जमविले आणि तो आणि इस्राएलचे पुढारी त्यांच्यापुढे आयच्या दिशेने चालत निघाले.

  13. संपूर्ण सैन्यदल जे त्याच्याबरोबर होते ते निघाले आणि शहरापर्यंत पोहोचले आणि त्या शहरासमोर आले. त्यांनी आयच्या उत्तरेकडे छावणी उभी केली त्यांच्यामध्ये आणि आय शहराच्यामध्ये खोरे होते.

  14. यहोशुआने त्याच्याबरोबर सुमारे पाच हजार पुरुष घेतले आणि त्यांना बेथेल आणि आय शहराच्यामध्ये पश्चिमेकडे दबा धरून बसविले होते.

  15. मुख्य छावणी शहराच्या उत्तरेकडे व दबा धरून बसलेले पश्चिमेकडे, याप्रमाणे सैन्याने आपआपले स्थान घेतले. त्या रात्री यहोशुआ खोर्‍यात गेला.

  16. जेव्हा आय शहराच्या राजाने हे पाहिले, तेव्हा तो आणि त्या शहराचे सर्व पुरुष पहाटेस घाई करून अराबासमोर एका विशिष्ट ठिकाणी इस्राएलशी युद्ध करण्यास निघाले. परंतु त्याला माहीत नव्हते की शहराच्या मागील बाजूस शत्रुसैन्य दबा धरून बसले आहे.

  17. नंतर यहोशुआ आणि सर्व इस्राएली सैन्याने त्यांना मागे येऊ दिले आणि त्यांच्यापुढे ते रानाच्या दिशेने पळाले.

  18. आय शहरातील सर्व पुरुषांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी बोलाविण्यात आले. ते यहोशुआचा पाठलाग करीत शहरापासून लांब गेले.

  19. इस्राएली लोकांच्या मागे गेला नाही असा एकही पुरुष आय शहरात किंवा बेथेल येथे मागे राहिला नाही. त्यांनी आय शहराच्या वेशी उघड्याच टाकल्या आणि इस्राएलचा पाठलाग करण्यास गेले.

  20. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “तुझा भाला आय शहराकडे उंच कर कारण ते शहर मी तुझ्या हाती देणार आहे.” तेव्हा यहोशुआने त्याच्या हातात असलेला भाला त्या शहराच्या दिशेने उंच केला.

  21. त्याने तसे केले त्याच क्षणाला दबा धरून बसलेले पुरुष त्यांच्या जागेतून बाहेर आले आणि पुढे पळत निघाले. त्यांनी त्या शहरात प्रवेश केला आणि ते ताब्यात घेतले आणि लगेच ते शहर पेटवून दिले.

  22. आयच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांच्या शहरातून धूर निघून वर आकाशात जात आहे, परंतु आता कोणत्याही दिशेकडे पळून जाणे त्यांना शक्य नव्हते; जे इस्राएली लोक रानाकडे पळत चालले होते ते आता मागे वळून त्यांचा पाठलाग करणार्‍यांवर चालून आले.

  23. कारण जेव्हा यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की दबा धरून बसलेल्या सैन्याने शहराचा ताबा घेतला आहे आणि तिथून धूर निघून वर जात आहे तेव्हा ते मागे फिरले आणि त्यांनी आयच्या पुरुषांवर हल्ला केला.

  24. दबा धरून बसलेले सैन्यसुद्धा शहरातून बाहेर पडून त्यांच्या विरोधात आले तेव्हा ते दोन्ही बाजूंनी इस्राएली लोकांमध्ये सापडले. इस्राएली लोकांनी त्या सर्वांना मारून टाकले, त्यातील कोणीही जिवंत ठेवला नाही किंवा निसटूनही गेला नाही.

  25. परंतु त्यांनी आय शहराच्या राजाला जिवंत ताब्यात घेतले आणि त्याला यहोशुआकडे आणले.