Skip to content

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती २६:१सुमारे इ.स.पू. १८०४

    त्या देशात दुष्काळ पडला—अब्राहामाच्या काळात पडला त्या खेरीज हा दुसरा दुष्काळ होता—म्हणून इसहाक गरार या शहरात पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याजकडे गेला.

  2. उत्पत्ती २६:२सुमारे इ.स.पू. १८०४

    याहवेहने तिथे इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “खाली इजिप्त देशात जाऊ नकोस; मी तुला सांगतो त्या देशात राहा.

  3. उत्पत्ती २६:३सुमारे इ.स.पू. १८०४

    या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन.

  4. उत्पत्ती २६:४सुमारे इ.स.पू. १८०४

    मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्‍यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील.

  5. उत्पत्ती २६:५सुमारे इ.स.पू. १८०४

    कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.”

  6. उत्पत्ती २६:६सुमारे इ.स.पू. १८०४

    म्हणून इसहाक गरारातच राहिला.

  7. उत्पत्ती २६:७सुमारे इ.स.पू. १८०४

    जेव्हा तेथील लोकांनी त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” कारण “ती माझी पत्नी आहे” असे सांगण्याची त्याला भीती वाटली; त्याने विचार केला, “या ठिकाणचे लोक रिबेकाहमुळे कदाचित मला मारून टाकतील, कारण ती फार सुंदर आहे.”

  8. उत्पत्ती २६:८सुमारे इ.स.पू. १८०४

    तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे.

  9. उत्पत्ती २६:९सुमारे इ.स.पू. १८०४

    अबीमेलेखाने इसहाकाला बोलाविणे पाठविले आणि त्याला म्हणाला, “निश्चितच ही तुझी पत्नी आहे, ‘तर ती माझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” इसहाकाने उत्तर दिले, “तिच्यामुळे माझा कोणी वध करेल अशी मला भीती वाटली.”

  10. उत्पत्ती २६:१०सुमारे इ.स.पू. १८०४

    अबीमेलेखाने उद्गार काढले, “तू आमच्यासोबत असे का केले? माझ्या लोकांपैकी कोणीही तिच्यासोबत निजला असता आणि तू आमच्यावर दोष आणला असतास.”

  11. उत्पत्ती २६:११सुमारे इ.स.पू. १८०४

    यानंतर अबीमेलेखाने जाहीर फर्मान काढले: “या मनुष्याला किंवा याच्या पत्नीला कोणी त्रास दिल्यास त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाईल.”

  12. उत्पत्ती २६:१२सुमारे इ.स.पू. १८०४

    इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले.

  13. उत्पत्ती २६:१३सुमारे इ.स.पू. १८०४

    तो श्रीमंत होत गेला आणि त्याचे धन असे वाढत गेले की पुढे तो खूप धनाढ्य झाला.

  14. उत्पत्ती २६:१४सुमारे इ.स.पू. १८०४

    त्याच्याकडे इतके मेंढ्या, गुरे आणि नोकर होते की पलिष्ट्यांनी त्याचा हेवा केला.

  15. उत्पत्ती २६:१५सुमारे इ.स.पू. १८०४

    म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या.

  16. उत्पत्ती २६:१६सुमारे इ.स.पू. १८०४

    तेव्हा अबीमेलेखाने इसहाकाला म्हटले, “तू आमच्यापासून दूर निघून जा; तू आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहेस.”

  17. उत्पत्ती २६:१७सुमारे इ.स.पू. १८०४

    तेव्हा इसहाकाने ते ठिकाण सोडले आणि गरारच्या खोर्‍यात तळ देऊन राहू लागला.

  18. उत्पत्ती २६:१८सुमारे इ.स.पू. १८०४

    इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली.

  19. उत्पत्ती २६:१९सुमारे इ.स.पू. १८०४

    इसहाकाच्या नोकरांनी खोर्‍यात एक नवी विहीर खणली आणि तिथे त्यांना गोड पाण्याचा एक झरा सापडला.

  20. उत्पत्ती २६:२०सुमारे इ.स.पू. १८०४

    मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले.

  21. उत्पत्ती २६:२१सुमारे इ.स.पू. १८०४

    मग त्यांनी दुसरी एक विहीर खणली; पण तिच्यावरूनही पुन्हा भांडणे झाली, म्हणून तिचे नाव सितनाह असे ठेवले.

  22. उत्पत्ती २६:२२सुमारे इ.स.पू. १८०४

    यानंतर इसहाकाने आणखी एक विहीर खणली, पण त्यावेळी कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव रेहोबोथ असे ठेवले. तो म्हणाला, “आता तरी याहवेहने आम्हाला जागा दिली आहे. आता आमची या देशात भरभराट होईल.”

  23. उत्पत्ती २६:२३सुमारे इ.स.पू. १८०४

    पुढे इसहाक तिथून बेअर-शेबाला गेला;

  24. उत्पत्ती २६:२४सुमारे इ.स.पू. १८०४

    त्याच रात्री याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा पिता अब्राहामाचा परमेश्वर आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन आणि तुझा वंश वाढवेन.”

  25. उत्पत्ती २६:२५सुमारे इ.स.पू. १८०४

    मग इसहाकाने तिथे एक वेदी बांधली आणि याहवेहची उपासना केली. त्याने तिथे वस्ती केली आणि तिथे त्यांच्या नोकरांनी एक विहीर खणली.