Goshen
30.7200, 31.8000 गूगल नकाशावर पाहा
Goshen चा उल्लेख असलेली वचने
म्हणजे तुम्ही, तुमची मुले व तुमची नातवंडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि जे सर्वकाही तुमचे आहे, त्यासह तुम्हाला येथे गोशेन प्रांतात राहता येईल.
याकोबाने गोशेनला जाण्याचा मार्ग विचारण्याकरिता यहूदाहला त्यांच्या पुढे योसेफाकडे पाठविले. मग जेव्हा ते गोशेन प्रांतात पोहोचले,
योसेफाने आपला रथ तयार केला आणि आपला पिता इस्राएल यांना भेटण्याकरिता गोशेन प्रांतात गेला. भेट होताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते बराच वेळ रडले.
तेव्हा तुम्ही असे उत्तर द्यावे, ‘आमच्या वडीलांप्रमाणे तुझ्या सेवकांनी लहानपणापासून गुरे पाळली आहेत.’ म्हणजे तो तुम्हाला येथेच गोशेन प्रांतात राहू देईल, कारण इजिप्तमध्ये मेंढपाळांना तुच्छ मानले जाते.”
योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.”
ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.”
आणि संपूर्ण इजिप्त देश तुझ्यासमोर आहे; या देशातील उत्तम भागात तुझ्या पित्याला आणि भावांना राहण्यास दे. त्यांना गोशेन येथे राहू दे. आणि त्यांच्यापैकी कोणी विशेष क्षमता असणारे असतील तर त्यांच्यावर माझ्याही गुरांची जबाबदारी सोपवून दे.”
अशा रीतीने इस्राएली इजिप्तच्या गोशेन प्रांतात राहू लागले, आणि त्यांनी तिथे जमीनजुमला संपादन केला व ते फलद्रूप होऊन संख्येने खूप वाढले.
तसेच योसेफाचे पूर्ण कुटुंब म्हणजे त्याचे भाऊ आणि त्यांचे कुटुंब, या सर्वांसह गेला. परंतु त्यांनी त्यांची मुलेबाळे, गुरे, शेरडेमेंढरे गोशेन प्रांतातच मागे ठेवली.
“पण त्या दिवशी माझे लोक राहतात त्या गोशेन प्रांताशी मी वेगळा वागेन; त्या ठिकाणी मात्र गोमाश्यांचे थवे नसतील, यावरून तुला समजावे की, मी याहवेह या भूमीवर आहे.
फक्त एकच असे ठिकाण होते जिथे गारा पडल्या नाही; तो गोशेन प्रांत, ज्या ठिकाणी इस्राएली लोक राहत होते.