Skip to content

Joseph

199 वचने · 17 कुटुंब सदस्य

Joseph चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिने त्याचे नाव योसेफ असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.”

  2. राहेलने योसेफास जन्म दिल्यानंतर याकोब लाबानास म्हणाला, “माझी रवानगी करा म्हणजे मी माझ्या देशाला जाईन.

  3. सर्वात पुढे त्याने आपल्या दासी आणि त्यांची मुले; त्यांच्यामागे लेआ व तिची मुले आणि त्यांच्यानंतर राहेल व योसेफ अशा रीतीने त्यांना ठेवले.

  4. त्यानंतर लेआ व तिची मुले आली, शेवटी राहेल आणि योसेफ पुढे आली. त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला.

  5. राहेलचे पुत्र: योसेफ व बिन्यामीन हे होते.

  6. याकोबाच्या कुटुंबाचा वृतांत असा आहे: योसेफ सतरा वर्षांचा तरुण असताना आपल्या भावांबरोबर, त्याच्या वडिलांच्या पत्नी बिल्हा व जिल्पा यांच्या पुत्रांबरोबर कळप चारीत असे, तेव्हा योसेफाने, त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी वडिलांकडे आणल्या.

  7. इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला.

  8. एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले.

  9. इस्राएलने योसेफाला म्हटले, “तुझे भाऊ शेखेम येथे मेंढरे चारावयास गेले आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे.” योसेफ म्हणाला, “ठीक आहे.”

  10. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, “होय, पण आता ते येथे नाहीत, ‘आपण दोथानला जाऊ’ तुझ्या भावांना असे बोलताना मी ऐकले.” तेव्हा योसेफ भावांच्या मागे दोथानला गेला आणि ते त्याला तिथे आढळले.

  11. योसेफ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्याचा झगा—जो गडद रंगाचा, सुशोभित होता—ओढून काढला,

  12. मिद्यानी व्यापार्‍यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्‍यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.

  13. जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली.

  14. मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला, एक बोकड मारला आणि त्याच्या रक्तात तो झगा बुडवला.

  15. त्याने तो झगा ओळखला आणि म्हणाला, “होय, हा माझ्या मुलाचाच झगा आहे; त्याला वनपशूने खाऊन टाकले असावे. योसेफाचे त्याने फाडून तुकडे केले आहे यात शंका नाही.”

  16. इकडे योसेफाला इजिप्तमध्ये आणले. फारोह अंमलदार व अंगरक्षकांचा प्रमुख पोटीफराने इश्माएली लोकांपासून योसेफास विकत घेतले.

  17. याहवेह योसेफाबरोबर होते, म्हणून तो सफल व्यक्ती बनला आणि तो इजिप्तच्या धन्याच्या घरी राहत असे.

  18. त्यामुळे साहजिकच योसेफ त्याचा आवडता झाला व त्याचा व्यक्तिगत सेवक बनला. लवकरच पोटीफराच्या घराची व्यवस्था व त्याचे सर्व व्यवहार त्याच्या ताब्यात देण्यात आले.

  19. जेव्हापासून त्याने योसेफाला त्याच्या घरावर, व त्याचे जे काहीही होते त्या सर्वांवर अधिकारी म्हणून नेमले, तेव्हापासून योसेफामुळे याहवेहने त्या इजिप्तच्या धन्याला आशीर्वादित केले; पोटीफराचे जे काही होते, त्याचे कुटुंब व शेती यावर याहवेहचा आशीर्वाद होता.

  20. म्हणून पोटीफराने आपले सर्वकाही योसेफाला सोपवून दिले. आपण काय खावे यापलीकडे त्याने कशाचीच काळजी केली नाही. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता.

  21. काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!”

  22. ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले.

  23. एके दिवशी असे घडून आले की, तो कामानिमित्त घराच्या आत आला असताना, घरात दुसरे कोणतेही सेवक नव्हते;

  24. योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाच्या कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवीत, तिथे त्याने योसेफाला ठेवले, परंतु जेव्हा योसेफ तुरुंगात होता,

  25. याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्‍याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले.