Skip to content

Reuben

70 वचने · 18 कुटुंब सदस्य

Reuben चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.”

  2. गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात काम करताना एके दिवशी त्याला पुत्रदात्रीची फळे सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेलने लेआजवळ विनंती केली, “तुझ्या मुलाने पुत्रदात्रीची फळे आणली आहेत, त्यातील काही मला दे.”

  3. तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले.

  4. लेआचे पुत्र: याकोबाचा ज्येष्ठपुत्र रऊबेन, मग शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून.

  5. जेव्हा रऊबेनने हे ऐकले तेव्हा त्याने योसेफाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; तो म्हणाला, “आपण त्याला जिवे मारणार नाही;

  6. आपण रक्तपात करणार नाही; तर आपण त्याला या रानातल्या विहिरीत फेकून देऊ; परंतु त्याला हात लावू नका.” रऊबेनने असा बेत केला होता की नंतर योसेफाला विहिरीतून काढावे आणि आपल्या वडिलांकडे परत पाठवून द्यावे.

  7. जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली.

  8. रऊबेन म्हणाला, “त्या मुलाविरुद्ध असे पाप करू नका, हे मी तुम्हाला सांगत नव्हतो का? पण तुम्ही माझे ऐकले नाही! आम्हाला त्याच्या रक्तपाताचा हिशोब द्यावा लागेल.”

  9. तेव्हा रऊबेन आपल्या वडिलांस म्हणाला, “मी बिन्यामीनाला तुमच्याकडे परत आणले नाही तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका; बिन्यामीनाला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणेन.”

  10. इजिप्तला गेलेल्या इस्राएलाच्या पुत्रांची (याकोब आणि त्याचे वंशज) ही नावे आहेत: रऊबेन हा याकोबाचा प्रथम जन्मलेला.

  11. रऊबेनाचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  12. “आता मी इजिप्तमध्ये तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला इजिप्तमध्ये झालेले दोन पुत्र माझेच गणले जातील; जसे रऊबेन व शिमओन तसेच एफ्राईम व मनश्शेह हेदेखील माझेच आहे.

  13. “रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.

  14. रऊबेन, शिमओन, लेवी आणि यहूदाह;

  15. त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही: इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र: हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  16. “तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;

  17. इस्राएलचा पहिला पुत्र रऊबेनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे, सैन्यात सेवा करण्यास सक्षम असणाऱ्या सर्व पुरुषांची नावे, त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  18. रऊबेनाच्या गोत्रांची संख्या 46,500 होती.

  19. दक्षिणेच्या बाजूस: रऊबेनच्या छावणीच्या दलाने त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा असावा. रऊबेनच्या लोकांचा पुढारी शेदेऊरचा पुत्र एलीसूर आहे.

  20. रऊबेनच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,51,450 होते. ते दुसर्‍या रांगेत निघतील.

  21. चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले.

  22. त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता.

  23. त्यांची नावे ही आहेत: रऊबेन गोत्रातील जक्कूरचा पुत्र शम्मुवा;

  24. लेवीचा पुत्र कोहाथ, त्याचा पुत्र इसहार, त्याचा पुत्र कोरह, आणि रऊबेन गोत्रातील काही लोक म्हणजे एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम व पेलेथाचा पुत्र ओन हे उन्मत्त झाले

  25. रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे: हनोखपासून हनोखी कूळ; पल्लूपासून पल्लूवी कूळ;