मुख्य मजकुरावर जा

Reuben

70 वचने · 18 कुटुंब सदस्य

Reuben चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रऊबेन गोत्राचे लोक व गाद गोत्राच्या लोकांकडे मोठी खिल्लारे व कळपे होती. त्यांनी पाहिले की याजेर आणि गिलआद हे प्रांत कळपासाठी उत्तम आहेत.

  2. म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले,

  3. मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?

  4. गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू.

  5. मोशे त्यांना म्हणाला, “जर गाद आणि रऊबेन गोत्राचे लोक, त्यांच्यातील प्रत्येक पुरुष जो युद्धासाठी हत्यारबंद झालेला, याहवेहसमोर तुमच्याबरोबर यार्देन पार करतील, जेव्हा तुमच्यापुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही गिलआदाचा प्रांत त्यांना त्यांचे वतन म्हणून द्यावा.

  6. गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे.

  7. तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्‍यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.

  8. रऊबेन गोत्राच्या लोकांनी हेशबोन, एलिआलेह, आणि किर्याथाईमची पुनर्बांधणी केली,

  9. कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे.

  10. रऊबेनाचा वंशज एलियाब, याचे पुत्र दाथान व अबीराम यांचे त्यांनी काय केले, जेव्हा पृथ्वीने सर्व इस्राएली छावणीच्या मध्यभागी आपले तोंड उघडले आणि तिने त्यांना, त्यांच्या घरादारांना, त्यांच्या डेर्‍यांना आणि त्यांच्या सर्व मालकीचे सर्व जिवंत प्राणी कसे गिळून टाकले हे तुमच्या मुलांनी पाहिले नाही.

  11. आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

  12. “रऊबेन जिवंत राहो व त्यास मृत्यू न येवो, त्याची माणसे कमी न होवोत.”

  13. मग मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र इस्राएली लोकांपुढे युद्धासाठी सुसज्ज होऊन पुढे निघाले.

  14. रऊबेन गोत्राला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने त्यांना जी भूमी दिली ती ही:

  15. यार्देनच्या किनार्‍यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.

  16. व पुढे बेथ-होगलाहपर्यंत चढून बेथ-अराबाहच्या उत्तरेकडे रऊबेनाचा पुत्र बोहनच्या खडकापर्यंत गेली.

  17. तथापि लेवी वंशास तुमच्यामध्ये भाग मिळणार नाही, कारण याहवेहची याजकीय सेवा हेच त्यांचे वतन आहे. गाद, रऊबेन आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला आधी त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेकडे मिळाले आहे. याहवेहचे सेवक मोशेने ते त्यांना दिले आहे.”

  18. मग ती सीमा उत्तरेस वळून एन-शेमेशकडे जाऊन पुढे गलीलोथ जे अदुमिम्माच्या उतरणीच्या समोर होते तिथे गेली. नंतर तिथून ती खाली रऊबेनाचा पुत्र बोहन याच्या खडकाकडे जाते.

  19. यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली.

  20. मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांनुसार रऊबेन, गाद आणि जबुलून गोत्रातून बारा नगरे मिळाली.

  21. रऊबेनच्या गोत्राकडून: बेसेर, याहसाह,

  22. तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.

  23. जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली.

  24. आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले,

  25. म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.