- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 95
The Revelation
John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.
या कालखंडातील वचने
- प्रकटीकरण १:१सुमारे इ.स. ९६
ज्यागोष्टी लवकरच निश्चितच घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्यांनी आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहानाला ते कळविले.
- प्रकटीकरण १:२सुमारे इ.स. ९६
योहानाने जे सर्व पाहिले त्याविषयी साक्ष दिली—ती म्हणजे, परमेश्वराचे वचन आणि येशू ख्रिस्ताची साक्ष.
- प्रकटीकरण १:३सुमारे इ.स. ९६
जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे.
- प्रकटीकरण १:४सुमारे इ.स. ९६
योहानाकडून,
- प्रकटीकरण १:५सुमारे इ.स. ९६
आणि जे विश्वसनीय साक्षीदार, मृतातील प्रथमफळ आणि पृथ्वीवरील राजांचे शासक आहेत त्या येशू ख्रिस्तापासून तुम्हास कृपा आणि शांती लाभो. त्यांना, जे आमच्यावर प्रीती करतात आणि ज्यांच्या रक्ताद्वारे आमची पापांपासून सुटका झाली आहे
- प्रकटीकरण १:६सुमारे इ.स. ९६
आणि ज्या येशूंनी परमेश्वराची व त्यांच्या पित्याची सेवा करण्यासाठी आमची त्यांचे राज्य व याजक म्हणून निवड केली आहे, त्यांना सदासर्वकाळ गौरव व सामर्थ्य असो! आमेन.
- प्रकटीकरण १:७सुमारे इ.स. ९६
“पाहा, ते मेघारूढ होऊन येत आहेत,” आणि “प्रत्येक नेत्र त्यांना पाहील, स्वतः त्याला भोसकणारेही त्यांच्याकडे पाहतील” आणि तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक “त्यांच्यामुळे शोक करतील.”
- प्रकटीकरण १:८सुमारे इ.स. ९६
प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.”
- प्रकटीकरण १:९सुमारे इ.स. ९६
मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो.
- प्रकटीकरण १:१०सुमारे इ.स. ९६
प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला.
- प्रकटीकरण १:११सुमारे इ.स. ९६
तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.”
- प्रकटीकरण १:१२सुमारे इ.स. ९६
माझ्याशी कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, आणि जेव्हा मी मागे वळलो तेव्हा तिथे सोन्याच्या सात समया असल्याचे मला दिसले.
- प्रकटीकरण १:१३सुमारे इ.स. ९६
त्या समयांच्या मध्यभागी मानवपुत्रासारखा दिसणारा कोणी एक उभा होता. त्यांनी पायघोळ वस्त्र घातले होते व छातीवर सोन्याचा पट्टा बांधला होता.
- प्रकटीकरण १:१४सुमारे इ.स. ९६
त्यांच्या डोक्यावरील केस पांढर्या लोकरीसमान, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्यांचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे भेदक होते.
- प्रकटीकरण १:१५सुमारे इ.स. ९६
त्यांचे पाय जणू काही भट्टीतून शुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्यांची वाणी गर्जना करणार्या धबधब्यासारखी होती.
- प्रकटीकरण १:१६सुमारे इ.स. ९६
त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता.
- प्रकटीकरण १:१७सुमारे इ.स. ९६
त्यांना पाहताक्षणीच मी त्यांच्या पायाशी मृतवत होऊन पडलो. पण त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेऊन म्हटले, “भिऊ नको! मी पहिला व शेवटचा, जिवंत असलेला तो मीच आहे; मी मृत होतो आणि पाहा, आता मी सदासर्वकाळ जिवंत आहे! आणि मृत्यूच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.
- प्रकटीकरण १:१८सुमारे इ.स. ९६
I am he that liveth, and was dead; and, behold, I am alive for evermore, Amen; and have the keys of hell and of death.
- प्रकटीकरण १:१९सुमारे इ.स. ९६
“तर तू जे पाहिले, जे आता आहे आणि यानंतर घडणार आहे, ते सर्व लिहून ठेव.
- प्रकटीकरण १:२०सुमारे इ.स. ९६
तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”
- प्रकटीकरण २:१सुमारे इ.स. ९६
“इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतात व जे सोन्याच्या सात समयांमध्ये चालतात, ते असे म्हणतात.
- प्रकटीकरण २:२सुमारे इ.स. ९६
तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे.
- प्रकटीकरण २:३सुमारे इ.स. ९६
माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे.
- प्रकटीकरण २:४सुमारे इ.स. ९६
परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे.
- प्रकटीकरण २:५सुमारे इ.स. ९६
तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समई तिच्या स्थानापासून दूर करेन.