Skip to content

Trumpet बद्दल बायबलमधील वचने

139 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी किंवा धनुष्यबाणाने मारावे; कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ते मनुष्य असो वा प्राणी, त्यांना जिवंत राहू देऊ नये. जेव्हा एडक्याच्या शिंगाचा दीर्घ नाद कानी पडेल तेव्हाच त्यांनी पर्वताजवळ यावे.”

  2. मग मोशे पर्वतावरून खाली उतरून लोकांकडे गेला, त्याने त्यांना शुद्ध केले व लोकांनी आपले कपडे धुतले.

  3. मग तो लोकांना म्हणाला, “तिसर्‍या दिवसासाठी आपली तयारी करा, लैंगिक संभोगापासून दूर राहा.”

  4. तिसर्‍या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले.

  5. मग मोशेने लोकांना परमेश्वराला भेटण्यासाठी छावणीच्या बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले.

  6. सीनाय पर्वत धुराने झाकून गेला होता, कारण याहवेह अग्निरुपात पर्वतावर उतरले होते. भट्टीतून निघावा तसा धूर उठला होता आणि सगळा पर्वत जोरात थरथरत होता.

  7. कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते.

  8. जेव्हा लोकांनी विजा पाहिल्या आणि गडगडाट व तुतारीचा आवाज ऐकला आणि धुराने भरलेला पर्वत पाहिला, ते भीतीने कंपित झाले व दूर उभे राहिले

  9. “इस्राएली लोकास सांग: ‘सातव्या महिन्याचा पहिला दिवस तुम्ही शब्बाथ विश्रांतीसाठी ठेवावा, या दिवशी पवित्र मेळावा करून स्मृतिदिन म्हणून कर्णे फुंकावेत.

  10. मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी तुम्ही सर्वत्र कर्णे फुंकावे. प्रायश्चित्ताच्या दिवशी संपूर्ण देशात तुम्ही मोठ्या आवाजाचे कर्णे दीर्घकाल वाजवावे.

  11. याहवेह मोशेला म्हणाले:

  12. “तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर.

  13. दोन्ही कर्णे वाजविले म्हणजे सर्व समुदायाने सभामंडपाच्या प्रवेशव्दाराजवळ तुझ्यापुढे एकत्र जमावे.

  14. जर एकच कर्णा वाजविला, तर इस्राएली कुलप्रमुखांनी तुझ्यापुढे जमावे.

  15. जेव्हा कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेकडे तळ दिलेल्या वंशानी पुढे निघावे.

  16. दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील

  17. जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे.

  18. “अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनीच कर्णे वाजवावे. हा तुम्हाला व येणार्‍या तुमच्या पिढ्यांसाठी सर्वकाळचा नियम असावा.

  19. जेव्हा तुम्ही तुमच्याच देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाता, तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचे स्मरण करतील व तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सोडविले जाईल.

  20. तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

  21. “ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र सभा भरवा व नियमित कामे करू नये. तो तुमच्यासाठी कर्णे वाजविण्याचा दिवस आहे.

  22. एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासाने आपल्याबरोबर पवित्रस्थानातील साहित्य व इशारा देण्यासाठी कर्णे घेतले होते, त्याच्यासह मोशेने प्रत्येक गोत्रातील एक हजार पुरुषांना युद्धात पाठवले.

  23. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले.

  24. मेंढ्याच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन सात याजक कोशाच्या पुढे ठेवा. सातव्या दिवशी याजक रणशिंगे वाजवित शहराभोवती सात वेळेस प्रदक्षिणा घालतील.

  25. जेव्हा त्यांच्या रणशिंगाचा मोठा व दीर्घ आवाज तुम्ही ऐकाल, त्यावेळी संपूर्ण सैन्याने मोठा जयघोष करावा. तेव्हा शहराचा तट कोसळेल आणि सैन्य पुढे जाईल, नंतर प्रत्येकजण सरळ आत प्रवेश करेल.”