मुख्य मजकुरावर जा

Trumpet बद्दल बायबलमधील वचने

139 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्‍या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते.

  2. पृथ्वीवरील गवत, वनस्पती किंवा झाडेझुडूपे, यांना उपद्रव न करता ज्या लोकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का नाही, त्यांच्यावर हल्ला करण्यास सांगण्यात आले होते.

  3. त्यांना ठार मारण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे काम सोपविले होते. विंचू मनुष्याला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणार्‍या पीडेसारखी ती होती.

  4. त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल.

  5. पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते.

  6. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.

  7. त्यांनी लोखंडी ऊरस्त्राणासारखी ऊरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता.

  8. त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्‍या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती.

  9. अथांग कूपाचा सत्ताधारी देवदूत त्यांचा राजा होता. त्याचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन, हेल्लेणी भाषेत अपल्लूओन (जो सर्वनाशक) असे आहे.

  10. एक अनर्थ आता संपला आहे; पण आणखी दोन अनर्थ येणार आहेत.

  11. नंतर सहाव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा परमेश्वराच्या राजासनासमोरील सोन्याच्या वेदीच्या चारही शिंगातून निघालेली एक वाणी मी ऐकली.

  12. ज्या सहाव्या देवदूताजवळ रणशिंग होते त्याला ती म्हणाली, “यूफ्रेटीस नदीवर बांधून ठेवलेल्या चारही देवदूतांना मोकळे कर.”

  13. पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.”

  14. कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.”