मुख्य मजकुरावर जा

East

6 verses

31.9500, 35.9200 गूगल नकाशावर पाहा

"East" साठी शोधा

East चा उल्लेख असलेली वचने

  1. जेव्हा कधी इस्राएली लोक आपल्या पिकांची पेरणी करीत, तेव्हा मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील लोक देशावर आक्रमण करत असत.

  2. त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्‍यात तळ दिला.

  3. मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर देशांचे लोक टोळांप्रमाणे त्या खोर्‍यात दाटीने पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे इतके अधिक होते की, त्यांची गणती करणे शक्य नव्हते.

  4. आता जेबह राजा व सलमुन्ना राजा आपल्या उरलेल्या पंधरा हजार सैनिकांसह कर्कोर येथे पोहोचले होते, पूर्वेकडील देशांच्या मित्र सेनांपैकी तेवढेच सैनिक उरले होते; कारण त्यांचे एक लाख वीस हजार सैनिक आधीच ठार झालेले होते.

  5. म्हणून तुमच्या पूर्वेस असलेल्या लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून तुम्हाला मी त्यांच्या स्वाधीन करेन. ते त्यांच्या छावण्या तुमच्यात उभारतील व त्यांचे तंबू तुमच्यात बांधतील; ते तुमची फळे खातील व तुमचे दूध पितील.

  6. अम्मोनी लोकांबरोबर मोआबला सुद्धा मी पूर्वेकडील लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून स्वाधीन करेन, म्हणजे राष्ट्रांमध्ये अम्मोनी लोकांचे स्मरण केले जाणार नाही;