- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
The Ishmaelites बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
मिश्मा, दूमाह, मस्सा,
हदद, तेमा, यतूर, नापीश आणि केदमाह.
आता जेबह राजा व सलमुन्ना राजा आपल्या उरलेल्या पंधरा हजार सैनिकांसह कर्कोर येथे पोहोचले होते, पूर्वेकडील देशांच्या मित्र सेनांपैकी तेवढेच सैनिक उरले होते; कारण त्यांचे एक लाख वीस हजार सैनिक आधीच ठार झालेले होते.
मग गिदोनाने नोबाह व योगबेहाहच्या पूर्वेस राहुट्यात राहणार्या लोकांच्या वाटेने वर जाऊन बेसावध सेनेवर अचानक हल्ला चढविला.
जेबह व सलमुन्ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.
योआशाचा पुत्र गिदोन युद्धावरून हेरेसच्या खिंडीतून परत आला.
तिथे त्याने सुक्कोथातील एका तरुणास पकडले व त्याला विचारले आणि त्या तरुणाने सुक्कोथ येथील सर्व सत्याहत्तर अधिकारी आणि वडीलजनांची नावे लिहून दिली.
मग गिदोन आला आणि सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “यांना पाहा हे जेबह राजा व सलमुन्ना यांच्याविषयी तुम्ही मला टोमणा मारत म्हटले होते, ‘आता तुझ्या हातात ओरेब व जेबाचे हात आहेत काय? मग आम्ही तुझ्या थकलेल्या सैन्याला भाकरी का द्यावी?’ ”
मग त्याने त्या शहरातील वडिलांना पकडले आणि सुक्कोथ येथील लोकांना रानातील काटे आणि काटेरी झुडपांची शिक्षा देऊन धडा शिकविला.
त्याने पेनुएल येथील बुरूज मोडून टाकला व त्या शहरातील पुरुषांचा संहार केला.
मग गिदोनाने जेबह राजा व सलमुन्ना राजाला विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांना ठार केले ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच, प्रत्येकजण राजपुत्राप्रमाणे दिसत होते.”
गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.”
मग आपल्या ज्येष्ठपुत्र येथेर याच्याकडे वळून त्याला म्हणाला, “त्यांना ठार कर!” परंतु येथेर याने आपली तलवार उपसली नाही, कारण तो कोवळा मुलगा होता आणि भयभीत झाला.
जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले.
आता इस्राएलचे लोक गिदोनास म्हणू लागले, “तू आमच्यावर राज्य कर; तू आणि तुझे पुत्र आणि तुझे नातूही; कारण मिद्यानी लोकांच्या हातातून तू आम्हाला सोडविले आहे.”
परंतु गिदोनाने त्यांना म्हटले, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही किंवा माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही. याहवेह तुमच्यावर राज्य करतील.”
आणि गिदोन म्हणाला, “माझी एक विनंती आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या लुटीतील एक कुंडले मला द्यावे.” (सोन्याची कुंडले घालण्याची इश्माएली लोकांची प्रथा होती.)
हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
मिश्मा, दूमाह, मस्सा, हदद, तेमा,
यतूर, नापीश आणि केदमाह.
रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रात 44,760 पुरुष योद्धे होते—ढालधारी, तलवारबहादूर, धनुर्धारी व युध्दकलानिपुण असे.
त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले.
त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली.
अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी: ददानी काफिल्यांनो, तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता,