Skip to content

Succoth

10 verses

32.1900, 35.6300 गूगल नकाशावर पाहा

Succoth चा उल्लेख असलेली वचने

  1. दरम्यान याकोब सुक्कोथ येथे गेला. तिथे त्याने स्वतःसाठी तंबू आणि आपल्या गुरांसाठी निवारा बांधला. म्हणूनच त्या ठिकाणाला सुक्कोथ असे नाव पडले.

  2. व खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निमराह, सुक्कोथ, साफोन म्हणजे हेशबोनचा राजा सीहोनच्या राज्याचे हे उरलेले राज्य होते (यार्देन नदीच्या पूर्वबाजूपासून किन्नेरेथ समुद्रापर्यंत त्यांची सीमा होती).

  3. तो सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्याबरोबरच्या लोकांना काही भाकरी द्या; कारण ते फार थकले आहेत आणि मी मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सलमुन्नाचा आताही पाठलाग करीत आहे.”

  4. परंतु सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, “आता तुझ्या हातात जेबह व सलमुन्नाचे हात आहेत का? मग आम्ही तुझ्या सैन्याला भाकरी का द्यावी?”

  5. मग तो तिथून पेनुएल येथे गेला आणि तिथेही त्याने तीच विनंती केली, पण त्यांनी देखील सुक्कोथ येथील लोकांप्रमाणे उत्तर दिले.

  6. तिथे त्याने सुक्कोथातील एका तरुणास पकडले व त्याला विचारले आणि त्या तरुणाने सुक्कोथ येथील सर्व सत्याहत्तर अधिकारी आणि वडीलजनांची नावे लिहून दिली.

  7. मग गिदोन आला आणि सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “यांना पाहा हे जेबह राजा व सलमुन्ना यांच्याविषयी तुम्ही मला टोमणा मारत म्हटले होते, ‘आता तुझ्या हातात ओरेब व जेबाचे हात आहेत काय? मग आम्ही तुझ्या थकलेल्या सैन्याला भाकरी का द्यावी?’ ”

  8. मग त्याने त्या शहरातील वडिलांना पकडले आणि सुक्कोथ येथील लोकांना रानातील काटे आणि काटेरी झुडपांची शिक्षा देऊन धडा शिकविला.

  9. राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या.

  10. राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या.