Skip to content

Travellers बद्दल बायबलमधील वचने

110 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अब्राहाम मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ राहत असताना, मध्यान्हाच्या उन्हात आपल्या तंबूच्या दारापुढे बसला होता, तेव्हा याहवेहने त्याला दर्शन दिले.

  2. अब्राहामाने आपली नजर वर करून पाहिले की तीन पुरुष जवळपास उभे आहेत, तो घाईने आपल्या तंबूच्या दाराकडून त्यांना भेटण्यास गेला व त्यांना भूमीपर्यंत लवून नमन केले.

  3. तो त्यांना म्हणाला, “माझ्या स्वामी, माझ्यावर आपली कृपा झाली असल्यास, माझ्या घरी न येता पुढे जाऊ नका.

  4. मी थोडे पाणी आणतो आणि तुम्ही आपले पाय धुऊन या झाडाखाली विसावा घ्या.

  5. तुम्हाला ताजेपणा यावा म्हणून थोडे अन्नही आणतो मग तुम्ही पुढील प्रवासास निघा; तुम्ही तुमच्या या सेवकाकडे आला आहात.” “ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे कर.” त्यांनी उत्तर दिले.

  6. मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”

  7. नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले.

  8. मग त्याने दूध, दही आणि वासराचे मांस घेतले, जे त्याने बनविले होते आणि ते त्यांच्यासमोर ठेवले; आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.

  9. लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.” ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.”

  10. लोट त्यांच्याबरोबर बोलण्यास बाहेर गेला आणि आपल्यामागे दार लावून घेतले.

  11. “आणि म्हणाला, नाही माझ्या मित्रांनो, असे भयंकर दुष्कर्म करू नका.

  12. पाहा, मला दोन कन्या आहेत ज्या अजून कुमारिका आहेत. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करतो; त्यांच्याशी तुम्हाला पाहिजे तसे वागा, पण या दोन माणसांच्या वाटेला जाऊ नका, कारण ते माझ्या आश्रयाला आले आहेत.”

  13. दुसर्‍या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली.

  14. जवळचे पाणी संपल्यावर तिने आपल्या पुत्राला एका झुडूपाखाली ठेवले,

  15. अब्राहामाने दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला.

  16. तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या.

  17. “प्या, माझ्या स्वामी,” असे म्हणून तिने लगेच आपली घागर वाकवून त्याला प्यायला पाणी दिले.

  18. त्यास पुरेसे पाणी पाजल्यानंतर ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीही त्यांना पुरेल इतके पाणी काढते.”

  19. तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.”

  20. मग तो मनुष्य त्यांच्या घरी गेला. उंटांवरून सामान उतरून त्यांना गवत आणि खाण्याकरिता चाराही देण्यात आला. त्यास व त्याच्या बरोबरीच्या लोकांस पाय धुण्याकरिता त्याने पाणीही दिले.

  21. यानंतर भोजन वाढण्यात आले; परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी भोजन करणार नाही.” लाबान म्हणाला, “ठीक आहे, आम्हाला सांग.”

  22. रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली

  23. याकोब बेअर-शेबा सोडून हारानास जाण्यास निघाला.

  24. तेव्हा आपले नातलग बरोबर घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सातव्या दिवशी गिलआद डोंगरावर गाठले.

  25. असे गुप्तपणे पळून तू मला का फसविले? तू मला का सांगितले नाही, जेणेकरून झांज व वीणेचे गायन-वादन करून समारंभाने आनंदाने निरोप देण्याची मला संधी मिळाली असती?