Skip to content

Travellers बद्दल बायबलमधील वचने

110 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही मला वचन दिल्याप्रमाणे जी वात्सल्य आणि विश्वसनीयता वारंवार दाखविलीस तिला वास्तविक मी पात्र नाही; मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय दुसरे काहीही नव्हते आणि आता माझे दोन गट झाले आहेत.

  2. म्हणूनच आपल्यापुढे भेटी पाठवली आणि याकोबाने ती रात्र तळावरच घालविली.

  3. त्याने त्यांना नदीच्या पलीकडे पाठविल्यावर त्याची सर्व संपत्तीही त्यांच्या पाठोपाठ पलीकडे पाठविली.

  4. मग ते भोजन करण्यास बसले असता त्यांना दूर अंतरावरून उंटांचा एक काफिला त्यांच्याकडे येताना दिसला. ते इश्माएली व्यापारी असून गिलआदहून इजिप्तला डिंक, मसाले व गंधरस घेऊन चालले होते.

  5. परंतु ते रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले असताना त्यांच्यापैकी एकाने गाढवांना देण्यासाठी थोडे धान्य काढले. धान्य काढीत असताना आपले पैसे पोत्याच्या तोंडाशी असलेले त्याला दिसले.

  6. तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा.

  7. त्या माणसापुढे, सर्वसमर्थ परमेश्वराने तुमच्यावर कृपा करावी म्हणजे तो दुसर्‍या भावाला आणि बिन्यामीनालाही तुमच्यासोबत परत पाठवेल. पण जर मी माझ्या पुत्रांना मुकलो तर मुकलो.”

  8. मग त्यांनी भेट व दुप्पट चांदी आणि बिन्यामीनाला सोबत घेतले आणि खाली इजिप्तला गेले आणि योसेफापुढे उपस्थित झाले.

  9. आता योसेफाने आपल्या घरकारभार्‍यास आदेश दिला: “माणसांच्या पोत्यात त्यांना वाहून नेण्याइतके अन्न भरावे आणि प्रत्येक माणसाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांची चांदी ठेवावी.

  10. “तो कुठे आहे?” रऊएलाने आपल्या मुलींना विचारले, “त्याला तुम्ही का सोडून आला? काहीतरी खावे म्हणून त्याला आमंत्रण द्या.”

  11. मोशे आपल्या मार्गात एके ठिकाणी मुक्कामास असताना, जसे याहवेह त्याला मारणारच असे गाठले.

  12. तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण आहे.

  13. इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते.

  14. मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.

  15. परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये.

  16. पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू.

  17. तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.”

  18. बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घातले आणि मोआबी सरदारांबरोबर निघाला.

  19. (सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.)

  20. तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले.

  21. त्यांनी अंगात जीर्ण झालेले कपडे व पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले आणि त्यांच्या शिदोर्‍यांत शिळ्या वाळलेल्या व बुरशी लागलेल्या भाकरी होत्या.

  22. म्हणून आमचे वडीलजन आणि आमच्या लोकांनी आम्हाला सूचना केली, ‘लांबच्या प्रवासाची तयारी करा: वाटेसाठी शिदोरी घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. आपली राष्ट्रे त्यांचे दास आहेत असे त्यांना जाहीर करा आणि शांतीच्या करारासाठी त्यांना विनंती करा.’

  23. आम्ही तुमच्याकडे येण्यास आमचे ठिकाण सोडले, तेव्हा या भाकरी गरम होत्या, परंतु आता तुम्ही पाहता की त्या वाळून त्यांना बुरशी लागली आहे.

  24. हे द्राक्षारसाचे बुधले अगदी नवीन होते, परंतु आता ते जुने झालेले आहेत व त्यांना भेगा पडलेल्या आहेत. आमचे कपडे व आमचे जोडे लांबच्या खडतर प्रवासाने जीर्ण झालेले आहेत.”

  25. “अनथाचा पुत्र शमगारच्या दिवसामध्ये, याएलच्या काळी राजमार्ग सुने पडले; प्रवाशांनी वळणाचा मार्ग वापरला.