Skip to content

Carmel

22 verses · 3 known names

हे नावानेही ओळखले जाते: Carmelite, Carmelitess

31.4300, 35.1300 गूगल नकाशावर पाहा

Carmel चा उल्लेख असलेली वचने

  1. केदेशचा राजा-एक, कर्मेलातील योकनामाचा राजा-एक,

  2. माओन, कर्मेल, जीफ, युत्ताह,

  3. अल्लामेलेख, अमआद आणि मिशाल. पश्चिमेकडे ती सीमा कर्मेल आणि शिहोर-लिबनाथजवळून जाते.

  4. सकाळी, अगदी पहाटे उठून शमुवेल शौलाला भेटायला निघाला, पण त्याला कोणी सांगितले, “शौल कर्मेलास गेला आहे. तिथे त्याने आपल्या स्वतःच्या आदरार्थ एक स्तंभ उभारला आहे आणि तिथून पुढे तो खाली गिलगालास गेला आहे.”

  5. माओन येथे एक श्रीमंत मनुष्य होता, ज्याची कर्मेलमध्ये मालमत्ता होती, त्याच्याकडे एक हजार बोकडे आणि तीन हजार मेंढरे होते आणि तो कर्मेलमध्ये लोकर कातरत होता.

  6. तेव्हा दावीदाने दहा तरुण पुरुष पाठवित म्हटले, “कर्मेल येथे नाबालकडे जा आणि माझ्या नावाने त्याला अभिवादन करा.

  7. “ ‘मी ऐकत आहे की, ही मेंढरे कातरण्याची वेळ आहे. जेव्हा तुझे मेंढपाळ आमच्याबरोबर होते, आम्ही त्यांच्याशी वाईट वागलो नाही आणि जितका काळ ते कर्मेल येथे होते त्यांचे काहीही हरवले नाही.

  8. त्याचे सेवक कर्मेल येथे जाऊन अबीगईलला म्हणाले, “दावीदाने आम्हाला तुमच्याकडे पाठविले आहे यासाठी की, तुम्हाला त्यांची पत्नी होण्यास आम्ही घेऊन जावे.”

  9. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर गथ येथे राहू लागले. प्रत्येकाबरोबर त्यांचे कुटुंब होते आणि दावीदाच्या दोन पत्नी; येज्रीली अहीनोअम आणि कर्मेली नाबालाची विधवा अबीगईल होत्या.

  10. दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते.

  11. तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला.

  12. त्याचा दुसरा पुत्र किलियाब, हा त्याला कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल हिच्यापासून झाला; तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमय याची कन्या माकाह हिच्यापासून झाला;

  13. कर्मेलचा हेस्रो, अर्बी येथील पारई,

  14. कर्मेलचा हेस्रो, एजबयाचा पुत्र नाराय,

  15. तुझ्या मस्तकाने कर्मेल डोंगरासारखे तुला मुकुटमंडित केले आहे. तुझे केस जांभळ्या रंगाच्या शाही पडद्यासारखे आहे; या केशसंभारात राजा बंदिस्त झाला आहे.

  16. भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.

  17. त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.

  18. “ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे, ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’ जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा, समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे.

  19. पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन, ते कर्मेल व बाशान येथे चरतील; एफ्राईम व गिलआदच्या डोंगरावर ते खाऊन तृप्त होतील.

  20. त्याने म्हटले: “याहवेह सीयोनातून गर्जना करतात आणि यरुशलेमातून गडगडाट करतात; मेंढपाळांची कुरणे सुकून जातात, आणि कर्मेलचा माथा कोमेजून जाईल.”

  21. कर्मेल पर्वताच्या शिखरावर ते लपून राहिले, तरी मी त्यांची शिकार करून त्यांना पकडेन. ते महासागराच्या तळाशी माझ्या दृष्टिआड लपून बसले तरी, मी सर्पाला त्यांना चावा घेण्याची आज्ञा देईन.

  22. ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो.