Skip to content

Mountains बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 82 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शेवटी पाणी इतके वाढले की, आकाशाखाली असलेले सर्व उंच पर्वतदेखील बुडून गेले.

  2. पाणी वाढले आणि पर्वतांना पंधरा हातापेक्षा जास्त खोलीपर्यंत झाकले.

  3. आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले.

  4. आणि होरी लोकांच्या टोळीला सेईर डोंगरात मार देऊन रानाच्या हद्दीवर असलेल्या एल-पारान येथपर्यंत पिटाळून लावले.

  5. सिद्दीमच्या खोर्‍यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले.

  6. मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”

  7. तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.”

  8. अशा रीतीने आपली सर्व चीजवस्तू घेऊन, फरात नदी ओलांडून ते सर्वजण गिलआद डोंगराळ प्रदेशाच्या वाटेला लागले.

  9. लाबानाने याकोबास गाठले तेव्हा याकोब गिलआद डोंगरमाथ्यावर तळ देऊन राहिला होता. मध्यंतरीच्या काळात लाबानानेदेखील आपला तळ डोंगराच्या पायथ्याशी दिला.

  10. म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली.

  11. तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.

  12. मोशे आपला सासरा, मिद्यानी याजक इथ्रो याची मेंढरे चारीत होता. तो ती मेंढरे घेऊन रानात, परमेश्वराचा डोंगर होरेबच्या मागच्या बाजूला गेला.

  13. परमेश्वराने म्हटले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला पाठविले आहे याचे चिन्ह हेच असणार: जेव्हा तू इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणशील, तेव्हा याच डोंगरावर तुम्ही परमेश्वराची उपासना कराल.”

  14. परमेश्वराचे विधी व नियम त्यांना शिकव आणि ज्या मार्गाने त्यांनी चालावे आणि त्यांचे वर्तन कसे असावे हे त्यांना दाखव.

  15. जर तू असे केले आणि परमेश्वराने तुला आज्ञा केली, तर तुला सोपे जाईल आणि हे लोकसुद्धा समाधानी होऊन घरी जातील.”

  16. रफीदीम येथून निघाल्यावर, त्यांनी सीनायच्या रानात प्रवेश केला आणि इस्राएल त्या ठिकाणी रानात पर्वतापुढे तळ देऊन राहिले.

  17. जेव्हा याहवेहने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले, तेव्हा त्यांनी मोशेला कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या दिल्या, ज्या परमेश्वराच्या बोटाने कोरलेल्या होत्या.

  18. संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला.

  19. आणि बामोथपासून मोआबामधील खोर्‍यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते.

  20. “अतारोथ, दिबोन, याजेर, निमराह, हेशबोन, एलिआलेह, सेबाम, नबो व बेओन;

  21. त्यांनी आलमोन-दिबलाथाइम सोडले व नबोजवळ अबारीम डोंगराजवळ तळ दिला.

  22. मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला.

  23. तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी.

  24. आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी.

  25. हे प्रभो, मला जाऊ द्या आणि यार्देनच्या पलीकडील उत्तम जमीन पाहू द्या—तो उत्तम डोंगराळ प्रदेश आणि लबानोन.”