मुख्य मजकुरावर जा

Mountains बद्दल बायबलमधील वचने: Of the church of God

4 वचने · 82 पैलू

Of the church of God बद्दल वचने

  1. पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जाईल; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल, आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील.

  2. मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.

  3. “त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.

  4. हा त्या खडकाच्या दृष्टान्ताचा अर्थ आहे, जो मनुष्याच्या हातून नव्हता, परंतु स्वतः एका पर्वतापासून तो खडका वेगळा झाला होता—ज्याने लोखंड, कास्य, माती, चांदी आणि सोने यांचा सर्वांचा चुराडा केला होता. “महान परमेश्वराने महाराजांना भविष्यात काय घडणार आहे हे दाखवून दिले. हे स्वप्न खरे आहे आणि त्याचा अर्थ विश्वास ठेवण्यालायक आहे.”