Skip to content

circa 970–930 BC

Solomon & The Temple

Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.

635 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे १:१सुमारे इ.स.पू. १०१५

    जेव्हा दावीद राजा फार वृद्ध झाला, तेव्हा त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येत नसे.

  2. 1 राजे १:२सुमारे इ.स.पू. १०१५

    म्हणून त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजाची सेवा करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आपण एक तरुण कुमारी शोधू या. तिने त्यांच्याजवळ झोपावे म्हणजे आमच्या स्वामींना ऊब येईल.”

  3. 1 राजे १:३सुमारे इ.स.पू. १०१५

    नंतर त्यांनी सर्व इस्राएली देशात एका सुंदर तरुण कुमारीचा शोध केला आणि त्यांना शूनेमकरीण अबीशग आढळली, त्यांनी तिला राजाकडे आणले.

  4. 1 राजे १:४सुमारे इ.स.पू. १०१५

    ती स्त्री खूप सुंदर होती; तिने राजाची काळजी घेतली आणि त्यांची सेवा केली, पण राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.

  5. 1 राजे १:५सुमारे इ.स.पू. १०१५

    त्यावेळी अदोनियाह, ज्याच्या आईचे नाव हग्गीथ होते, त्याने स्वतःला पुढे करीत म्हटले, “मी राजा होणार.” म्हणून त्याने रथ आणि घोडे तयार केले आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे घेतली.

  6. 1 राजे १:६सुमारे इ.स.पू. १०१५

    (“तू जे काही करतोस ते का करतोस?” असे त्याच्या वडिलांनी त्याला कधीही खडसावून विचारले नाही. तो सुद्धा फार रूपवान होता आणि अबशालोमच्या नंतर तो जन्मला होता.)

  7. 1 राजे १:७सुमारे इ.स.पू. १०१५

    जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला.

  8. 1 राजे १:८सुमारे इ.स.पू. १०१५

    परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला जाऊन मिळाले नाही.

  9. 1 राजे १:९सुमारे इ.स.पू. १०१५

    अदोनियाहने एन-रोगेलजवळ जोहेलेथच्या दगडावर मेंढरे, गुरे आणि पुष्ट वासरे यांचा यज्ञ केला. त्याने आपले सर्व भाऊ, राजपुत्र आणि यहूदीयाच्या सर्व राजकीय अधिकार्‍यांना आमंत्रित केले,

  10. 1 राजे १:१०सुमारे इ.स.पू. १०१५

    परंतु त्याने नाथान संदेष्टा, बेनाइयाह, खास रक्षक व त्याचा भाऊ शलोमोन यांना आमंत्रित केले नाही.

  11. 1 राजे १:११सुमारे इ.स.पू. १०१५

    तेव्हा शलोमोनची आई बथशेबा हिला नाथानाने विचारले, “हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा आता राजा झाला आहे, हे तू ऐकले नाही काय? आणि दावीद आमचे धनी यांना याविषयी काहीच माहिती नाही?

  12. 1 राजे १:१२सुमारे इ.स.पू. १०१५

    तर आता, तू आपला स्वतःचा आणि तुझा पुत्र शलोमोन याचा जीव कसा वाचवावा असा बोध मी तुला देतो.

  13. 1 राजे १:१३सुमारे इ.स.पू. १०१५

    दावीद राजाकडे जा आणि त्यांना सांग, ‘माझ्या स्वामी, आपण आपल्या दासीशी शपथ घेतली नव्हती काय, “खचितच माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन राजा होईल आणि तो माझ्या राजासनावर बसेल” तर मग अदोनियाह कसा राजा झाला?’

  14. 1 राजे १:१४सुमारे इ.स.पू. १०१५

    तू राजाबरोबर अजूनही बोलत असतानाच मी आत येईन आणि तू जे सांगितले त्यामध्ये माझे शब्द घालेन.”

  15. 1 राजे १:१५सुमारे इ.स.पू. १०१५

    तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती.

  16. 1 राजे १:१६सुमारे इ.स.पू. १०१५

    बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले. राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?”

  17. 1 राजे १:१७सुमारे इ.स.पू. १०१५

    ती त्यांना म्हणाली, “माझे स्वामी, मी तुमची दासी, मला तुम्ही तुमच्या याहवेह परमेश्वराची शपथ दिली होती की: ‘माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन हाच राजा होईल, आणि तो माझ्या राजासनावर बसेल.’

  18. 1 राजे १:१८सुमारे इ.स.पू. १०१५

    परंतु आता अदोनियाह राजा झाला आहे आणि माझ्या स्वामींना यातील काहीही माहीत नाही.

  19. 1 राजे १:१९सुमारे इ.स.पू. १०१५

    त्याने मोठ्या संख्येने पशू, पुष्ट वासरे आणि मेंढरे यांचा यज्ञ केला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना, अबीयाथार याजक आणि सैन्याचा सेनापती योआब यांना आमंत्रित केले, पण आपला सेवक शलोमोनला त्याने बोलाविले नाही.

  20. 1 राजे १:२०सुमारे इ.स.पू. १०१५

    माझे स्वामी, सर्व इस्राएली लोकांचे डोळे आपणाकडे लागले आहेत, की आपण हे घोषित कराल की माझ्या स्वामीनंतर तुमच्या सिंहासनावर कोण बसणार.

  21. 1 राजे १:२१सुमारे इ.स.पू. १०१५

    नाहीतर, माझे स्वामी त्यांच्या पूर्वजांबरोबर विसावा पावतील आणि मला आणि माझा पुत्र शलोमोनला दोषी असल्याची वागणूक दिली जाईल.”

  22. 1 राजे १:२२सुमारे इ.स.पू. १०१५

    ती राजाबरोबर बोलत असतानाच, नाथान संदेष्टा आला.

  23. 1 राजे १:२३सुमारे इ.स.पू. १०१५

    आणि राजाला सांगण्यात आले, “नाथान संदेष्टा आले आहेत.” म्हणून तो राजासमोर गेला आणि जमिनीपर्यंत लवून दंडवत केले.

  24. 1 राजे १:२४सुमारे इ.स.पू. १०१५

    नाथान संदेष्टा म्हणाला, “माझ्या स्वामी, अदोनियाह तुमच्यानंतर राजा होणार आणि तो तुमच्या राजासनावर बसणार अशी घोषणा तुम्ही केली आहे काय?

  25. 1 राजे १:२५सुमारे इ.स.पू. १०१५

    आज त्याने खाली जाऊन पुष्कळ संख्येने गुरे, पुष्ट वासरे आणि मेंढरांचा यज्ञ केला आहे. त्याने सर्व राजपुत्र, सैन्यांचे सेनापती आणि अबीयाथार याजक यांना आमंत्रित केले आहे. सध्या यावेळी ते त्याच्यासोबत खात व पीत आहेत आणि म्हणत आहेत, ‘राजा अदोनियाह चिरायू होवो!’