Skip to content

Place

12 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: house

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Place चा उल्लेख असलेली वचने

  1. मंदिरामध्येच पवित्रस्थान व परमपवित्रस्थान असावे म्हणून मंदिराच्या मागील बाजूला जमिनीपासून छप्परापर्यंत देवदारूच्या फळ्या लावून त्याने तो वेगळा केला.

  2. शुद्ध सोन्याची गंगाळे, वाती कापण्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; आतील खोलीच्या, म्हणजेच परमपवित्रस्थानाच्या आणि मंदिराच्या मुख्य खोलीच्या दरवाजासाठी सोन्याच्या कड्या.

  3. नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या नियोजित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.

  4. खचितच मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.”

  5. अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत.

  6. त्याने परमपवित्रस्थान बांधले, त्याची लांबी मंदिराच्या रुंदीएवढी, वीस हात लांब आणि वीस हात रुंद होती. त्याच्या आतील भाग सहाशे तालांत शुद्ध सोन्याने मढविला.

  7. मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात शलोमोनाने दोन कोरलेले करूब बसविले व त्यांनाही सोन्याने मढविले.

  8. दिव्याच्या वाती कापण्याची शुद्ध सोन्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; मंदिराचा सोन्याचा प्रवेशभाग: मुख्य द्वार, परमपवित्रस्थानाची आतील दारेसुध्दा सोन्याची होती.

  9. नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या निर्धारित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.

  10. आणि त्याने आतील पवित्रस्थानाची लांबी मापली; ती वीस हात होती आणि मुख्य दिवाणखान्याच्या शेवटपर्यंत त्याची रुंदी वीस हात होती. तो मला म्हणाला, “हे परमपवित्रस्थान आहे.”

  11. मंदिराच्या अंगणासमोरील पश्चिमेकडील इमारत सत्तर हात रुंद होती. सभोवार त्या इमारतीची भिंत पाच हात जाड होती आणि त्याची लांबी नव्वद हात होती.

  12. या पवित्र प्रदेशात, पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असा भाग मोजून घे. त्यात पवित्रस्थान, परमपवित्रस्थान असेल.