Skip to content

Public Prayer बद्दल बायबलमधील वचने

128 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘माझ्यासाठी मातीची वेदी तयार करा व त्यावर तुमची मेंढरे, बोकडे व तुमचे गुरे चढवून आपली होमार्पणे व शांत्यर्पणे ही अर्पण करा. जिथे कुठे माझ्या नावाचे गौरव व्हावा असे मी ठरवेन, तिथे मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन.

  2. तेव्हा यहोशुआने त्याची वस्त्रे फाडली आणि तो संध्याकाळपर्यंत याहवेहच्या कोशासमोर जमिनीवर तसाच पालथा पडून राहिला. इस्राएलच्या वडीलजनांनी तसेच केले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर राख शिंपडली.

  3. आणि यहोशुआ म्हणाला, “हाय, सार्वभौम याहवेह, तुम्ही आम्हाला अमोर्‍यांच्या हातून ठार करणार होता, तर आम्हाला यार्देन नदी पार करून का आणले? आम्ही यार्देन पलीकडे आमच्याजवळ होते त्यातच आम्ही समाधानी होतो!

  4. हे प्रभू तुमच्या सेवकाला क्षमा करा. आता इस्राएलचा त्यांच्या शत्रूकडून पराभव झालेला आहे तर मी काय बोलू?

  5. कारण कनानी लोक आणि आसपासची राष्ट्रे याबद्दल ऐकतील, तेव्हा ते आम्हाला सभोवार घेरतील, आमच्यावर हल्ला करतील आणि आम्हाला नामशेष करून टाकतील. मग तुमच्या महान नावाच्या थोरवीचे काय होईल?”

  6. दावीदाने सर्व सभेदेखत याहवेहची स्तुती केली, तो म्हणाला, “हे याहवेह परमेश्वरा, आमच्या इस्राएलच्या पित्याच्या परमेश्वरा, अनादि ते अनंतकालापर्यंत तुमची स्तुती असो.

  7. याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.

  8. श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे.

  9. आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो, आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो.

  10. “परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत.

  11. आम्ही तुमच्या दृष्टीने आमच्या पूर्वजांप्रमाणे परकीय व अगांतुक आहोत. आमचे पृथ्वीवरील दिवस एखाद्या सावलीप्रमाणे आहेत, काही आशा न ठेवता ते नाहीसे होतील.

  12. हे आमच्या याहवेह परमेश्वरा, तुमच्या पवित्र नावासाठी, तुमचे मंदिर बांधण्यास जे प्रचंड साहित्य आम्ही गोळा केले आहे, ते सर्व तुमच्याकडून मिळाले आहे, हे सर्वकाही तुमचेच आहे.

  13. माझ्या परमेश्वरा, मी जाणतो, तुम्ही हृदयाची परीक्षा घेता आणि खरेपणाने प्रसन्न होता. मी या सर्व वस्तू स्वखुशीने व प्रामाणिक हेतूने दिल्या आहेत. आणि आता हे बघून मला आनंद झाला की तुमच्या लोकांनीही किती आनंदाने स्वखुशीने या देणग्या दिल्या आहेत.

  14. हे याहवेह, आमच्या पित्या अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल यांच्या परमेश्वरा, तुमच्या लोकांच्या मनात या इच्छा कायम राखा आणि त्यांचे अंतःकरण तुमच्याशी एकनिष्ठ राहू द्या.

  15. माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”

  16. तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील;

  17. मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.”

  18. इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला.

  19. मग राजा म्हणाला: “याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीदाला आपल्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की,

  20. ‘मी माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, त्या दिवसापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, ज्यामुळे माझे नाव तिथे असावे किंवा माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी मी कोणालाही राज्यकर्ता म्हणून निवडले नाही.

  21. परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’

  22. “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते.

  23. पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले.

  24. तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’

  25. “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे.