Skip to content

Public Prayer बद्दल बायबलमधील वचने: David

10 वचने · 21 पैलू

David बद्दल वचने

  1. दावीदाने सर्व सभेदेखत याहवेहची स्तुती केली, तो म्हणाला, “हे याहवेह परमेश्वरा, आमच्या इस्राएलच्या पित्याच्या परमेश्वरा, अनादि ते अनंतकालापर्यंत तुमची स्तुती असो.

  2. याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.

  3. श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे.

  4. आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो, आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो.

  5. “परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत.

  6. आम्ही तुमच्या दृष्टीने आमच्या पूर्वजांप्रमाणे परकीय व अगांतुक आहोत. आमचे पृथ्वीवरील दिवस एखाद्या सावलीप्रमाणे आहेत, काही आशा न ठेवता ते नाहीसे होतील.

  7. हे आमच्या याहवेह परमेश्वरा, तुमच्या पवित्र नावासाठी, तुमचे मंदिर बांधण्यास जे प्रचंड साहित्य आम्ही गोळा केले आहे, ते सर्व तुमच्याकडून मिळाले आहे, हे सर्वकाही तुमचेच आहे.

  8. माझ्या परमेश्वरा, मी जाणतो, तुम्ही हृदयाची परीक्षा घेता आणि खरेपणाने प्रसन्न होता. मी या सर्व वस्तू स्वखुशीने व प्रामाणिक हेतूने दिल्या आहेत. आणि आता हे बघून मला आनंद झाला की तुमच्या लोकांनीही किती आनंदाने स्वखुशीने या देणग्या दिल्या आहेत.

  9. हे याहवेह, आमच्या पित्या अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल यांच्या परमेश्वरा, तुमच्या लोकांच्या मनात या इच्छा कायम राखा आणि त्यांचे अंतःकरण तुमच्याशी एकनिष्ठ राहू द्या.

  10. माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”