circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल १:१सुमारे इ.स.पू. १०५३
शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला.
- 2 शमुवेल १:२सुमारे इ.स.पू. १०५३
तिसर्या दिवशी शौलाच्या छावणीतून एक मनुष्य आला, त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोक्यावर धूळ घातलेली होती. तेव्हा तो दावीदाकडे आला आणि जमिनीवर पालथा पडून दंडवत घातले.
- 2 शमुवेल १:३सुमारे इ.स.पू. १०५३
“तू कुठून आला आहेस?” दावीदाने त्याला विचारले. त्याने उत्तर दिले, “मी इस्राएलच्या छावणीतून निसटून पळून आलो आहे.”
- 2 शमुवेल १:४सुमारे इ.स.पू. १०५३
दावीदाने विचारले, “काय झाले आहे, ते मला सांग.” त्याने उत्तर दिले, “सैनिक युद्धातून पळून गेले, पुष्कळजण पडले आणि मरण पावले. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे सुद्धा मरण पावले आहेत.”
- 2 शमुवेल १:५सुमारे इ.स.पू. १०५३
तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?”
- 2 शमुवेल १:६सुमारे इ.स.पू. १०५३
तो तरुण मनुष्य म्हणाला, “मी सहज गिलबोआच्या डोंगरावर होतो आणि तिथे शौल त्याच्या भाल्यावर टेकलेला आणि रथाचा सारथी आणि त्यांचे स्वार जोरात त्याचा पाठलाग करीत होते असे मला दिसले.
- 2 शमुवेल १:७सुमारे इ.स.पू. १०५३
जेव्हा तो मागे वळला आणि त्याने मला पाहिले व मला बोलाविले आणि मी म्हणालो, ‘मी काय करू शकतो?’
- 2 शमुवेल १:८सुमारे इ.स.पू. १०५३
“त्याने मला विचारले, ‘तू कोण आहेस?’ “ ‘मी अमालेकी आहे.’ मी उत्तर दिले.
- 2 शमुवेल १:९सुमारे इ.स.पू. १०५३
“तेव्हा तो मला म्हणाला, ‘येथे माझ्या बाजूला उभा राहा आणि मला मारून टाक! मी मृत्यूच्या यातनेत आहे, परंतु अजूनही मी जिवंतच आहे.’
- 2 शमुवेल १:१०सुमारे इ.स.पू. १०५३
“तेव्हा मी त्याच्या बाजूला उभा राहिलो आणि त्याला मारून टाकले, कारण मला माहीत होते की, भाल्यावर पडल्याने तो जगू शकला नसता. आणि जो राजमुकुट त्याच्या डोक्यावर होता आणि त्याच्या बाहुंवरचा कडा मी येथे माझ्या धन्याजवळ आणले आहेत.”
- 2 शमुवेल १:११सुमारे इ.स.पू. १०५३
तेव्हा दावीदाने आणि त्याच्या बरोबरच्या माणसांनी आपली वस्त्रे धरली व फाडली.
- 2 शमुवेल १:१२सुमारे इ.स.पू. १०५३
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि याहवेहचे सैन्य आणि इस्राएली राष्ट्र यांच्यासाठी त्यांनी शोक केला आणि ते रडले आणि संध्याकाळपर्यंत उपास केला कारण ते तलवारीने मारले गेले होते.
- 2 शमुवेल १:१३सुमारे इ.स.पू. १०५३
नंतर दावीदाने बातमी घेऊन आलेल्या मनुष्याला विचारले, “तू कुठला आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एका परदेशी मनुष्याचा पुत्र, एक अमालेकी आहे.”
- 2 शमुवेल १:१४सुमारे इ.स.पू. १०५३
दावीदाने त्याला विचारले, “याहवेहच्या अभिषिक्ताचा नाश करण्यासाठी तुझा हात उचलताना तुला भीती कशी वाटली नाही?”
- 2 शमुवेल १:१५सुमारे इ.स.पू. १०५३
तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांतील एकाला बोलाविले आणि म्हटले, “जा, त्याला मारून टाक!” तेव्हा त्याने त्याच्यावर वार केला आणि तो मनुष्य मरण पावला.
- 2 शमुवेल १:१६सुमारे इ.स.पू. १०५३
कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.”
- 2 शमुवेल १:१७सुमारे इ.स.पू. १०५३
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याविषयी दावीदाने हे विलापगीत रचले,
- 2 शमुवेल १:१८सुमारे इ.स.पू. १०५३
आणि यहूदीयाच्या लोकांना हे धनुष्याचे विलापगीत शिकविले जावे असा आदेश दिला (ते याशेरच्या पुस्तकात लिहिलेले आहे):
- 2 शमुवेल १:१९सुमारे इ.स.पू. १०५३
“हे इस्राएला, तुझ्या डोंगरांवर जसे एक चपळ हरिण मरून पडते, तसे शूरवीर पडले आहेत!
- 2 शमुवेल १:२०सुमारे इ.स.पू. १०५३
“गथमध्ये हे सांगू नका, अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका, नाहीतर पलिष्ट्यांच्या कन्या हर्ष पावतील, बेसुंत्यांच्या कन्या आनंद करतील.
- 2 शमुवेल १:२१सुमारे इ.स.पू. १०५३
“गिलबोआच्या डोंगरांनो, तुम्हावर दव किंवा पाऊस न येवो; तुमच्या उतरणीच्या शेतांवर पावसाच्या सरी न पडोत. कारण तिथे शूरवीराची ढाल तिरस्कृत झाली, शौलाची ढाल—यापुढे तेलाने पुसली जाणार नाही.
- 2 शमुवेल १:२२सुमारे इ.स.पू. १०५३
“वध केलेल्यांच्या रक्तापासून शूरवीरांच्या मांसापासून योनाथानचा बाण मागे फिरला नाही, शौलाची तलवार असमाधानाने परत आली नाही.
- 2 शमुवेल १:२३सुमारे इ.स.पू. १०५३
शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते.
- 2 शमुवेल १:२४सुमारे इ.स.पू. १०५३
“अहो, इस्राएलच्या कन्यांनो, शौलासाठी रुदन करा, ज्यांनी तुम्हाला किरमिजी रंगाची आणि भरजरीत कपडे घातली, ज्यांनी तुमची वस्त्रे सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित केली.
- 2 शमुवेल १:२५सुमारे इ.स.पू. १०५३
“हे बलवान युद्धात कसे पडले! योनाथान तुमच्या डोंगरावर मारला गेला आहे.