Skip to content

Gath

32 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Gittites

31.6900, 34.8400 गूगल नकाशावर पाहा

Gath चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएली लोकांच्या देशात एकही अनाकी जिवंत उरला नाही, मात्र गाझा, गथ व अश्दोद येथे काही उरले.

  2. पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश:

  3. तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” त्यांनी उत्तर दिले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश गथकडे घेऊन जा.” तेव्हा त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश तिथून हालविला.

  4. पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.

  5. एक्रोनपासून गथपर्यंत पलिष्ट्यांनी जी नगरे इस्राएलपासून ताब्यात घेतली होती ती इस्राएली लोकांस परत मिळाली आणि इस्राएली लोकांनी आसपासच्या प्रदेश सोडवून घेतला. व इस्राएली व अमोरी लोकात शांतता होती.

  6. तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.

  7. तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले.

  8. तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ व एक्रोन येथवर पडलेले होते.

  9. त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला.

  10. हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली.

  11. तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे माणसे गथ नगराचा राजा माओकचा पुत्र आखीशकडे गेले.

  12. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर गथ येथे राहू लागले. प्रत्येकाबरोबर त्यांचे कुटुंब होते आणि दावीदाच्या दोन पत्नी; येज्रीली अहीनोअम आणि कर्मेली नाबालाची विधवा अबीगईल होत्या.

  13. जेव्हा शौलाला कळले की, दावीद गथकडे पळून गेला आहे, त्यानंतर त्याने त्याचा शोध केला नाही.

  14. त्याने गथ येथे आणण्यासाठी एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नव्हते, कारण त्याला वाटले, “ते आमच्याबद्दल सांगतील आणि म्हणतील, ‘दावीदाने असे केले आहे.’ ” आणि जोपर्यंत तो पलिष्ट्यांच्या सीमेत राहिला तोपर्यंत तो असेच करीत असे.

  15. “गथमध्ये हे सांगू नका, अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका, नाहीतर पलिष्ट्यांच्या कन्या हर्ष पावतील, बेसुंत्यांच्या कन्या आनंद करतील.

  16. त्याची सर्व माणसे करेथी आणि पलेथी व सर्व सहाशे गित्ती लोक जे दावीदाबरोबर गथवरून आले होते ते त्यांच्याबरोबर राजापुढे चालत होते.

  17. आणखी दुसर्‍या एका युद्धात, जे गथ येथे झाले, त्यामध्ये प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.

  18. हे चार पुरुष गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीदाच्या आणि त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.

  19. परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथच्या राजाकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.”

  20. हे ऐकताच, त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि त्याच्या गुलामांचा शोध करीत आखीशकडे गथ येथे गेला. शिमीने जाऊन गथवरून आपल्या गुलामांना परत आणले.

  21. जेव्हा शलोमोनला सांगण्यात आले की शिमी यरुशलेमहून गथला गेला होता आणि परत आला आहे.

  22. या वेळेला अरामचा राजा हजाएलाने गथ शहरावर स्वारी केली आणि ते काबीज केले. मग यरुशलेमावर स्वारी करण्यासाठी त्याने कूच केले.

  23. त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.

  24. बरीयाह व शमा हे अय्यालोन लोकांचे कुटुंबप्रमुख होते व त्यांनी गथकरास पळवून लावले.

  25. काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली.