मुख्य मजकुरावर जा

Gath

32 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Gittites

31.6900, 34.8400 गूगल नकाशावर पाहा

Gath चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणखी गथ येथे झालेल्या दुसर्‍या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.

  2. हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.

  3. गथ, मारेशाह, जीफ,

  4. तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली.

  5. संगीत दिग्दर्शकासाठी. “दूरच्या एला वृक्षावर बसलेला कबुतर” या चालीवर आधारित. दावीदाची मिक्ताम गाण्याची रचना. पलिष्ट्यांनी गथ देशात दावीदाला धरले, त्या घटनेचा हा संदर्भ आहे. हे परमेश्वरा, मजवर दया करा, कारण शत्रू त्वेषाने माझा पाठलाग करीत आहे; दिवसभर निकराने ते माझ्यावर हल्ले करीतच असतात.

  6. कालनेह येथे जा आणि तिला पाहा; तिथून महान हमाथास जा, आणि तिथून खाली पलिष्ट्यांच्या गथ येथे जा. हे तुमच्या दोन राज्याहून अधिक उत्तम आहेत काय? त्यांचा देश तुमच्या देशाहून मोठा आहे काय?

  7. गथ मध्ये ही बातमी देऊ नका; अजिबात रडू नका. बेथ‑ले‑अफ्राह मध्ये जाऊन धुळीत लोळ.