Skip to content

Or Giants, the Rephaim बद्दल बायबलमधील वचने

18 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला

  2. म्हणजे अष्टारोथ व एद्रेईवर ज्याने राज्य केले त्या ओग राजाचे बाशानातील संपूर्ण राज्य. (रेफाईम लोकांपैकी तो शेवटचा होता.) मोशेने त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना वतनातून बाहेर घालवून दिले.

  3. त्यानंतर ती सीमा हिन्नोमाच्या खोर्‍यातून जाऊन यबूसी नगराच्या (म्हणजे यरुशलेम) दक्षिणेकडील बाजूने गेली. पुढे ती सीमा पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेकडील टोकास असलेल्या पर्वताच्या माथ्यावर जाऊन पोहोचली.

  4. तेव्हा यहोशुआने उत्तर दिले, “जर तुम्ही संख्येने पुष्कळ आहात आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश तुमच्यासाठी खूप लहान आहे, तर परिज्जी व रेफाईम लोक राहतात तो रानाचा प्रदेश तुमच्यासाठी मोकळा करून घ्या.”

  5. तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.

  6. दावीदाने आपल्या बटव्यातील एक दगड घेऊन, तो गोफणीत घातला व तो त्या पलिष्ट्याच्या कपाळावर मारला. तो दगड त्याच्या कपाळात शिरला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.

  7. अशाप्रकारे, दावीदाने त्या पलिष्ट्यावर गोफण व गोट्याद्वारे विजय मिळविला; त्याच्या हाती तलवार नसताना त्याने त्या पलिष्ट्याला मारून टाकले.

  8. इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईमच्या खोर्‍यात पसरले.

  9. तेव्हा दावीदाने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्याने पलिष्टी सैन्याला मारून टाकले.

  10. पुन्हा एकदा पलिष्टी आणि इस्राएल यांच्यामध्ये युद्ध झाले. दावीद आपल्या सैन्याला घेऊन पलिष्ट्यांशी लढण्यास गेला आणि तो थकून गेला.

  11. इशबी-बेनोब नावाचा राफाह वंशातील एक पुरुष, ज्याचा कास्याचा भाला तीनशे शेकेल वजनाचा होता आणि तो नवीन तलवार घेऊन सज्ज होत म्हणाला, की तो दावीदाला जिवे मारेल.

  12. परंतु जेरुइयाहचा पुत्र अबीशाई दावीदाचा बचाव करण्यासाठी आला; त्याने त्या पलिष्ट्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारले. तेव्हा दावीदाच्या लोकांनी दावीदाला शपथ घेत सांगितले, “येथून पुढे पुन्हा आपण आमच्याबरोबर युद्धासाठी येणार नाही, म्हणजे इस्राएलचा दिवा विझणार नाही.”

  13. कालांतराने पलिष्ट्यांबरोबर गोब येथे पुन्हा दुसरे युद्ध झाले. त्यावेळेस हुशाथी सिब्बखय याने राफाह वंशातील साफ याला ठार मारले.

  14. गोब येथे पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धामध्ये बेथलेहेम येथील याईरचा पुत्र एलहानान याने गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले ज्याच्या भाल्याची काठी विणकर्‍याच्या काठीसारखी होती.

  15. आणखी दुसर्‍या एका युद्धात, जे गथ येथे झाले, त्यामध्ये प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.

  16. जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनाथानने त्याला मारून टाकले.

  17. हे चार पुरुष गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीदाच्या आणि त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.

  18. जेव्हा कापणी करणारे उभे पीक कापतात, आणि धान्य त्यांच्या हातात गोळा करतात— जसे जेव्हा कोणी रेफाईमच्या खोऱ्यात धान्याची कणसे गोळा करतात तसे होईल.