Rephaim
हे नावानेही ओळखले जाते: valley
31.7500, 35.2200 गूगल नकाशावर पाहा
Rephaim चा उल्लेख असलेली वचने
त्यानंतर ती सीमा हिन्नोमाच्या खोर्यातून जाऊन यबूसी नगराच्या (म्हणजे यरुशलेम) दक्षिणेकडील बाजूने गेली. पुढे ती सीमा पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्यासमोर आणि रेफाईम खोर्याच्या उत्तरेकडील टोकास असलेल्या पर्वताच्या माथ्यावर जाऊन पोहोचली.
तिथून ती खाली रेफाईम खोर्याच्या उत्तरेस असलेल्या हिन्नोम खोर्याच्या जवळील डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पुढे हिन्नोम खोरे ओलांडून यबूसी लोक राहत त्या यरुशलेम शहराच्या दक्षिण बाजूने एन-रोगेल येथे गेली.
इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईमच्या खोर्यात पसरले.
पुन्हा एकदा पलिष्टी लोक आले आणि रेफाईमच्या खोर्यात पसरले.
हंगामाच्या वेळी, जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्यात छावणी दिली होती, तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेकडे आले.
जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले.
इकडे पलिष्टी लोकांनी येऊन रेफाईमच्या खोर्याला लुटले.
जेव्हा कापणी करणारे उभे पीक कापतात, आणि धान्य त्यांच्या हातात गोळा करतात— जसे जेव्हा कोणी रेफाईमच्या खोऱ्यात धान्याची कणसे गोळा करतात तसे होईल.