David
David चा उल्लेख असलेली वचने
तिथे राहणाऱ्या स्त्रिया म्हणाल्या, “आता नाओमीला मुलगा आहे!” आणि त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. जो इशायाचा पिता, जो दावीद राजाचा पिता होता.
ओबेद हा इशायचा पिता, आणि इशाय हा दावीदाचा पिता.
तेव्हा शमुवेलने तेलाचे शिंग घेतले व त्याच्या भावांदेखत दावीदाचा अभिषेक केला आणि त्या दिवसापासून याहवेहचा आत्मा सामर्थ्याने दावीदावर आला. नंतर शमुवेल रामाह येथे परत गेला.
तेव्हा शौलाने इशायाकडे निरोप पाठवून म्हटले, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत आहे त्याला माझ्याकडे पाठव.”
तेव्हा इशायाने आपला पुत्र दावीदाबरोबर भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू लादलेले एक गाढव शौलाकडे पाठविले.
दावीद शौलाकडे आला व त्याच्या सेवेस हजर झाला. शौलाला तो अतिशय आवडला व दावीद त्याचा एक शस्त्रवाहक झाला.
नंतर शौलाने इशायला संदेश पाठवून सांगितले, “दावीदाला माझ्या सेवेत असू दे. कारण मी त्याच्यावर प्रसन्न आहे.”
ज्या ज्यावेळी परमेश्वराकडून पाठविलेला दुष्ट आत्मा शौलावर येई, त्यावेळी दावीद आपली वीणा घेऊन वाजवित असे, तेव्हा शौलाला बरे वाटत असे, आणि दुष्ट आत्मा शौलाला सोडून जात असे.
दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता.
दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले,
परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे.
एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा.
सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईचे स्थानग्रहण करत होते.
दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले.
तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले.
दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?”
जेव्हा दावीदाचा थोरला भाऊ एलियाब याने दावीदाला या लोकांबरोबर बोलतांना पाहिले, तेव्हा तो त्याच्यावर रागाने भडकला आणि त्याला विचारले, “तू येथे का आलास? आणि ती थोडीशी मेंढरे रानात तू कोणाबरोबर सोडली आहेत? तू किती गर्विष्ठ आहेस आणि तुझे हृदय किती दुष्ट आहे हे मी जाणतो; तू येथे खाली केवळ युद्ध पाहायला आला आहेस.”
दावीद म्हणाला, “मी काय केले आहे? मी बोलूपण नये काय?”
दावीद जे बोलला ते कोणी ऐकले व ते शौलाला कळविले, तेव्हा शौलाने त्याला बोलावून घेतले.
दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.”
शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.”
परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले,
ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.” शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”
शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला.
दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला. तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला.