Ahinoam
Ahinoam चा उल्लेख असलेली वचने
दावीदाने येज्रीलची अहीनोअम हिच्याशीही विवाह केला होता आणि त्या दोघी त्याच्या पत्नी होत्या.
दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर गथ येथे राहू लागले. प्रत्येकाबरोबर त्यांचे कुटुंब होते आणि दावीदाच्या दोन पत्नी; येज्रीली अहीनोअम आणि कर्मेली नाबालाची विधवा अबीगईल होत्या.
दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते.
तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला.
हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता;
हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.