Skip to content

Amnon

21 वचने · 22 कुटुंब सदस्य

Amnon चा उल्लेख असलेली वचने

  1. हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता;

  2. काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोमची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला.

  3. अम्नोन त्याच्या बहिणीच्या प्रेमात इतका वेडा झाला की, तो आजारी पडला. तामार कुमारी होती आणि तिच्याशी काही करणे हे त्याला अशक्य होते.

  4. दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनादाब अम्नोनाचा सल्लागार असून अतिशय धूर्त होता.

  5. त्याने अम्नोनास विचारले, “तू जो राजाचा पुत्र असून दिवसेंदिवस असा क्षीण का दिसतोस? तू मला सांगणार नाहीस काय?” तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझा भाऊ अबशालोम याची बहीण तामारवर मी प्रेम करतो.”

  6. तेव्हा अम्नोन पडून राहिला आणि आजारी असल्याचे ढोंग केले. जेव्हा राजा त्याच्या भेटीस आला, तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझी बहीण तामार हिने येऊन माझ्या दृष्टीसमोर विशेष भाकरी बनविल्या तर मला आवडेल, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.”

  7. दावीदाने राजवाड्यात तामारकडे निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी भोजन तयार कर.”

  8. तेव्हा तामार तिचा भाऊ अम्नोनच्या घरी गेली, तो तर बिछान्यावर पडून होता. तिने थोडे पीठ घेतले, ते मळले, आणि त्याच्या दृष्टीसमोर भाकरी तयार केल्या आणि त्या भाजल्या.

  9. नंतर तिने ताट घेतले आणि त्याला भाकर वाढली परंतु त्याने खाण्यास नकार दिला. अम्नोन म्हणाला, “प्रत्येकाला येथून बाहेर घालवून द्या.” तेव्हा प्रत्येकजण त्याच्यापासून निघून गेले.

  10. नंतर अम्नोन तामारला म्हणाला, “भाकरी माझ्या झोपण्याच्या खोलीकडे घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हाताने ती खाईन.” तेव्हा तिने बनविलेल्या भाकरी घेऊन तामार आपला भाऊ अम्नोनच्या खोलीकडे आली.

  11. नंतर अम्नोनाला तिचा तीव्र तिरस्कार वाटू लागला. वास्तविकता त्याने तिच्यावर जितके प्रेम केले होते, त्यापेक्षाही त्याला अधिक तिचा तिरस्कार वाटला. नंतर अम्नोन तिला म्हणाला, “ऊठ आणि चालती हो!”

  12. तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, “तुझा भाऊ अम्नोन तुझ्याबरोबर होता काय? तर आता माझ्या बहिणी, शांत हो, तो तुझा भाऊ आहे. ही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस.” आणि तामार तिचा भाऊ अबशालोमच्या घरात एकाकी अशी राहू लागली.

  13. आणि अबशालोम अम्नोनास चांगले किंवा वाईट काहीही बोलला नाही; त्याने अम्नोनाचा तिरस्कार केला कारण त्याने त्याची बहीण तामारला बेअब्रू केले होते.

  14. तेव्हा अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही, तर माझा भाऊ अम्नोन याला आमच्याबरोबर येऊ द्या.” राजाने त्याला विचारले, “त्याने तुमच्याबरोबर का जावे?”

  15. परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले.

  16. अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.”

  17. तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले.

  18. परंतु दावीदाचा भाऊ शिमिआह याचा पुत्र योनादाब म्हणाला “सर्वच राजपुत्रांना मारून टाकले आहे असा माझ्या धन्याने विचार करू नये; केवळ अम्नोन मरण पावला आहे. कारण अम्नोनाने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता, तेव्हापासून अबशालोमाने हा निश्चय केला होता.

  19. माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.”

  20. आणि दावीद राजाला अबशालोमकडे जाण्याची इच्छा झाली, कारण अम्नोनाच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन झाले होते.

  21. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.