- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Absalom बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्याचा दुसरा पुत्र किलियाब, हा त्याला कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल हिच्यापासून झाला; तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमय याची कन्या माकाह हिच्यापासून झाला;
आणि अबशालोम अम्नोनास चांगले किंवा वाईट काहीही बोलला नाही; त्याने अम्नोनाचा तिरस्कार केला कारण त्याने त्याची बहीण तामारला बेअब्रू केले होते.
दोन वर्षानंतर, जेव्हा एफ्राईमच्या सीमेवर बआल-हासोर येथे अबशालोमच्या मेंढरांची लोकर कातरणी होती, तेव्हा त्याने राजांच्या सर्व पुत्रांना तिथे येण्यास आमंत्रण दिले.
अबशालोम राजाकडे गेला आणि म्हणाला, “तुमच्या सेवकाकडे मेंढ्यांची लोकर कातरणी आहे, राजा आणि त्याचे सेवक कृपा करून माझ्या सहभागी होतील काय?”
राजाने उत्तर दिले, “नाही, माझ्या पुत्रा, आम्ही सर्वांनीच जाऊ नये; आम्ही तुझ्यासाठी केवळ भार होऊ.” जरी अबशालोमाने त्याला आग्रह केला, तरीही राजाने जाण्यास नकार दिला परंतु त्याने त्याला आशीर्वाद दिला.
तेव्हा अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही, तर माझा भाऊ अम्नोन याला आमच्याबरोबर येऊ द्या.” राजाने त्याला विचारले, “त्याने तुमच्याबरोबर का जावे?”
परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले.
अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.”
तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले.
अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला.
जेरुइयाहचा पुत्र योआब याला माहीत होते की, अबशालोमला भेटावे असे राजाला मनापासून वाटते.
तेव्हा योआबाने कोणा एकाला तकोवा येथे पाठवले आणि तिथून एका शहाण्या स्त्रीला बोलावून आणले. तो तिला म्हणाला, “तू शोक करीत असल्याचे ढोंग कर. शोकवस्त्रे परिधान कर, आणि सुवासिक तेल अंगाला लावू नकोस. आणि पुष्कळ दिवसांपासून मृत व्यक्तीसाठी शोक करीत असल्याचे ढोंग कर.
मग राजाकडे जा आणि असे बोल.” आणि काय बोलावे ते योआबाने तिला सांगितले.
जेव्हा तकोवा येथून आलेली स्त्री राजाकडे गेली, राजाला सन्मान देण्यासाठी तिने तोंड भूमीकडे लवून दंडवत केले, आणि म्हणाली, “महाराज, माझी मदत करा!”
राजाने तिला विचारले, “तुला काय त्रास आहे?” ती म्हणाली, “मी विधवा आहे; माझा पती मरण पावला आहे.
आपल्या सेविकेला दोन मुले होती. शेतामध्ये ती दोघे भांडू लागली आणि ते भांडण मिटविण्यास तिथे कोणी नव्हते. एकाने दुसर्यावर वार केला आणि त्याला जिवे मारले.
आता संपूर्ण कुटुंब आपल्या सेविकेविरुद्ध उठले आहे; ते म्हणतात, ‘ज्याने त्याच्या भावाला मारले त्याला आमच्या हाती सोपवून दे, म्हणजे त्याच्या भावाच्या जिवाबद्दल ज्याला त्याने मारून टाकले त्याचा आम्ही नाश करू; म्हणजे जो वारस राहिला आहे त्याच्यापासूनसुद्धा आमची सुटका होईल.’ याप्रकारे जो माझा एकमात्र निखारा राहिलेला आहे, तो सुद्धा ते विझवतील, व या भूतलावर माझ्या पतीचे ना नाव ना वारस राहील.”
राजा त्या स्त्रीला म्हणाला, “घरी जा, आणि मी तुझ्याबाजूने आदेश देईन.”
परंतु तकोवाची ती स्त्री राजाला म्हणाली, “माझ्या धनीराजाने मला आणि माझ्या कुटुंबाला क्षमा करावी, आणि राजा आणि त्याचे सिंहासन निर्दोष असो.”
राजाने उत्तर दिले, “तुला जर कोणी काही म्हटले, तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये, आणि ते पुन्हा तुला त्रास देणार नाहीत.”
ती म्हणाली, “तर मग राजाने याहवेह आपल्या परमेश्वराला विनंती करावी, म्हणजे रक्ताचा सूड घेणार्याला हानी करण्यापासून प्रतिबंध करावा, म्हणजे माझ्या मुलाचा नाश होणार नाही.” तो म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, तुझ्या मुलाच्या डोक्यावरील एक केसही जमिनीवर पडणार नाही.”
तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या सेविकेला माझ्या धनीराजाशी एक शब्द बोलू द्यावा.” राजाने म्हटले, “बोल,”
ती स्त्री म्हणाली, “तर मग परमेश्वराच्या लोकांविरुद्ध आपण अशी योजना का केली? जेव्हा राजा असे म्हणतो, कारण राजाने स्वतः घालवून दिलेल्या आपल्याच मुलाला परत आणले नाही, तेव्हा तो स्वतःलाच दोषी ठरवीत नाही का?
जसे जमिनीवर सांडलेले पाणी पुन्हा गोळा करता येत नाही, तसेच आपणही मेले पाहिजे. परंतु परमेश्वराची तशी इच्छा नाही; तर घालवून दिलेला व्यक्ती कायमचा त्यांच्यापासून घालवून दिला जाऊ नये अशी योजना परमेश्वर करतात.