मुख्य मजकुरावर जा

Absalom बद्दल बायबलमधील वचने: Death and burial

9 वचने · 10 पैलू

Death and burial बद्दल वचने

  1. यावेळी अचानक अबशालोमची दावीदाच्या माणसांशी गाठ पडली. तो त्याच्या खेचरावर बसून जात असता, खेचर एका मोठ्या एला झाडाच्या दाट फांद्यांखालून गेले आणि अबशालोमचे केस त्यात अडकले. तो हवेत लटकत राहिला आणि त्याचे खेचर ज्यावर तो बसला होता ते पुढे चालत राहिले.

  2. जेव्हा दावीदाच्या एका मनुष्याने जे झाले ते पाहिले व त्याने ते योआबाला सांगितले, “अबशालोमला एलाच्या झाडाला लटकत असलेले मी पाहिले.”

  3. ज्या मनुष्याने त्याला हे सांगितले, त्याला योआब म्हणाला, “काय! तू त्याला पाहिले? तू त्याला तिथेच मारून जमिनीवर का पाडले नाही? मी तुला चांदीची दहा शेकेल आणि योद्ध्याचा कंबरपट्टा दिला असता.”

  4. पण त्या मनुष्याने योआबाला उत्तर दिले, “जरी माझ्या हातावर चांदीची हजार शेकेल वजन करून ठेवली, तरी मी राजपुत्रावर हात टाकणार नाही. कारण राजाने तुला, अबीशाईला व इत्तयला आज्ञा देताना आम्ही असे ऐकले की, ‘माझ्यासाठी तरुण अबशालोमचे रक्षण करा.’

  5. आणि असे करून जरी मी माझा जीव धोक्यात घातला असता; तरी राजापासून काही गुप्त राहत नाही; आणि तू सुद्धा माझ्यापासून दूर राहिला असता.”

  6. योआब म्हणाला, “मी असा तुझ्यासाठी थांबणार नाही.” असे म्हणत त्याने आपल्या हाती तीन भाले घेतले आणि अबशालोम एलाच्या झाडाला अजूनही जिवंत असा लटकलेला असताना त्याने त्याच्या छातीत ते भोसकले.

  7. त्यानंतर योआबाचे दहा शस्त्रवाहक अबशालोमच्या सभोवती जमले, त्याच्यावर वार केला आणि त्याला मारून टाकले.

  8. नंतर योआबाने रणशिंग फुंकले, तेव्हा सैनिकांनी इस्राएलचा पाठलाग करण्याचे थांबविले, कारण योआबाने त्यांना थांबविले.

  9. त्यांनी अबशालोमला घेऊन, जंगलात एका खड्ड्यात फेकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली, त्या दरम्यान सर्व इस्राएली लोक आपआपल्या घरी पळून गेले.