Skip to content

The Mule बद्दल बायबलमधील वचने

17 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)

  2. “ ‘माझ्या आज्ञा पाळा. “ ‘तुम्ही आपल्या पशूंना भिन्न जातीच्या जनावरांशी संग करू देऊ नये. “ ‘तुमच्या शेतात दोन प्रकारच्या बियांची पेरणी करू नका. “ ‘दोन प्रकारच्या कापडांपासून विणलेली वस्त्रे वापरू नयेत.

  3. तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले.

  4. यावेळी अचानक अबशालोमची दावीदाच्या माणसांशी गाठ पडली. तो त्याच्या खेचरावर बसून जात असता, खेचर एका मोठ्या एला झाडाच्या दाट फांद्यांखालून गेले आणि अबशालोमचे केस त्यात अडकले. तो हवेत लटकत राहिला आणि त्याचे खेचर ज्यावर तो बसला होता ते पुढे चालत राहिले.

  5. राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा.

  6. त्याचप्रमाणे रथाच्या घोड्यांसाठी व इतर घोड्यांसाठी देखील जव व वैरण त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी आणत असत.

  7. आणि जे लोक येत असत, ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत.

  8. अहाबाने ओबद्याहला म्हटले, “देशातील सर्व झरे व ओढे शोध, घोडे व खेचरे जिवंत राहावे म्हणून कदाचित आपल्याला थोडे गवत मिळेल म्हणजे आपल्याला त्यांना मारून टाकावे लागणार नाही.”

  9. नामान म्हणाला, “तुम्हाला नजराणे नको असतील तर घेऊ नका, पण निदान माझ्यावर थोडी कृपा करा आणि बरोबर नेण्यासाठी मला दोन खेचरांवर लादून नेता येईल एवढी येथील माती तरी द्या, कारण येथून पुढे याहवेहशिवाय मी इतर कोणत्याही दैवताला कधीही होमार्पण किंवा यज्ञार्पण करणार नाही.

  10. शेजारच्या लोकांनी म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली प्रांतांपर्यंत जे राहत होते, त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल इत्यादी खाण्याच्या वस्तू गाढवे, उंट खेचरे व बैल यांच्यावर लादून आणल्या होत्या. त्याचप्रमाणे असंख्य बैल व शेरडेमेंढरे पण आणली होती. कारण इस्राएलात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता.

  11. त्यांनी आपल्याबरोबर 736 घोडे, 245 खेचरे,

  12. And he wrote in the king Ahasuerus' name, and sealed it with the king's ring, and sent letters by posts on horseback, and riders on mules, camels, and young dromedaries:

  13. अशा रीतीने संदेशवाहकांनी शाही वेगवान घोड्यांवर स्वार होऊन व राजाज्ञेनुसार राज्यात सर्वत्र पत्र नेले. हे फर्मान शूशन राजवाड्यात काढण्यात आले.

  14. तुमची मनोवृत्ती घोड्यासारखी किंवा खेचरासारखी नसावी, ज्यांना काही समज नसते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी अंकुश आणि लगाम लागतो, अन्यथा ते आपल्याजवळ येणार नाहीत.

  15. आणि सर्व राष्ट्रातून, तुमच्या सर्व लोकांना ते यरुशलेममधील माझ्या पवित्र पर्वतावर—घोड्यांवरून, रथातून, डोल्यांतून, खेचरांवरून व उंटावरून याहवेहसाठी अर्पण म्हणून आणतील,” असे याहवेह म्हणतात. “इस्राएल लोक ज्याप्रमाणे अन्नार्पण करतात त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात विधिपूर्वक शुद्ध पात्रात आणतील.

  16. “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत.

  17. अशीच मरी घोडे, खेचरे, उंट, गाढवे यावर आणि शत्रूच्या ठाण्यातील इतर सर्व प्राण्यांवर पसरेल.