Skip to content

Gihon

5 verses

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Gihon चा उल्लेख असलेली वचने

  1. राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा.

  2. तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले.

  3. आणि सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा राजा म्हणून गीहोन येथे अभिषेक केला आहे. तिथून ते मोठ्या आनंदाने वर गेले आणि शहरात त्या आवाजाचा नाद होत आहे. तोच आवाज आपण ऐकत आहात.

  4. हिज्कीयाहनेच गीहोन झर्‍याचा वर जाणारा मार्ग अडविला आणि पाण्याचा मार्ग दावीदाच्या नगरीच्या पश्चिमेकडे नेला. त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तो यशस्वी झाला.

  5. नंतर त्याने दावीदाच्या नगराची बाहेरील भिंत गीहोन झऱ्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यात, मासे फाटकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि ओफेलच्या टेकडीला वेढा घालून ती पुन्हा बांधली; त्याने त्या भिंती जास्त उंच केल्या. त्याने यहूदीयामधील सर्व तटबंदी नगरांमध्ये सैन्याचे सेनापती नेमले.