Skip to content

Jehoiada

21 वचने · 1 कुटुंब सदस्य

Jehoiada चा उल्लेख असलेली वचने

  1. यहोयादाचा पुत्र बेनाइयाह हा करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता; आणि दावीदाचे पुत्र शासकीय सल्लागार होते.

  2. योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता;

  3. कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.

  4. यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती.

  5. परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला जाऊन मिळाले नाही.

  6. परंतु मी आपला सेवक आणि सादोक याजक, आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, आणि आपला पुत्र शलोमोन यांना त्याने आमंत्रित केले नाही.

  7. दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह यांना आत बोलवा.” जेव्हा ते राजापुढे आले,

  8. यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत.

  9. तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले.

  10. राजाने त्याच्यासोबत सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी आणि पलेथी यांना पाठविले आहे आणि त्यांनी त्याला राजाच्या खेचरावर बसविले आहे,

  11. म्हणून शलोमोन राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला आज्ञा केली, आणि त्याने अदोनियाहवर वार केला आणि तो मेला.

  12. शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.”

  13. तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने जाऊन योआबावर वार केला आणि त्याला मारून टाकले आणि त्याला रानात त्याच्या घरी पुरले.

  14. मग राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला योआबाच्या जागी सैन्याचा अधिकारी म्हणून आणि अबीयाथाराच्या जागी सादोकला याजक म्हणून नेमले.

  15. तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला राजाने आज्ञा दिली आणि त्याने बाहेर जाऊन शिमीवर वार केला आणि तो मेला. आता शलोमोनच्या हातात राज्य प्रस्थापित झाले.

  16. यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, मुख्य सेनापती होता; सादोक व अबीयाथार, हे याजक होते.

  17. कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.

  18. यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती.

  19. याजकांपैकी अहरोन घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर 3,700 लोक होते.

  20. यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते.

  21. तिसर्‍या महिन्याच्या सैन्य विभागाचा सेनापती, प्रमुख याजक यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.