मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Judah बद्दल बायबलमधील वचने

84 वचने · 42 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.

  2. यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस. माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो. सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो, सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?

  3. यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, ज्याचे जे आहे तो येईपर्यंत, राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.

  4. तो आपले गाढव द्राक्षवेलीला, गाढवीचे शिंगरू उत्कृष्ट द्राक्षवेलीला बांधून ठेवणार आहे; आपला झगा द्राक्षारसात, आपली वस्त्रे द्राक्षाच्या रक्तात धुणार आहे.

  5. त्याचे नेत्र द्राक्षारसापेक्षा गर्द होतील, त्याचे दात दुधापेक्षाही पांढरे होतील.

  6. पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.

  7. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  8. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.

  9. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षांचा कोकरा;

  10. पापार्पणासाठी एक बोकड;

  11. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  12. एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.

  13. यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.

  14. पेरेसचे वंशज हे होते: हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; हामूलपासून हामूली कूळ.

  15. यहूदाह गोत्रास त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकून देण्यात आलेला प्रदेश एदोमाच्या सीमेपर्यंत आणि सीनच्या वाळवंटातील दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला होता.

  16. त्यांची दक्षिण सीमा मृत समुद्राच्या दक्षिणेस असलेल्या शेवटच्या खाडीपासून सुरू झाली,

  17. अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस असलेल्या मार्गाने सीन रानाच्या कडेने जाऊन दक्षिणेस कादेश-बरनेआपर्यंत. नंतर ती हेस्रोनच्या पुढे अद्दारपर्यंत आणि कारकाला वळण घेते.

  18. नंतर पुढे जाऊन ती आजमोनच्या बाजूने इजिप्तच्या ओढ्यापर्यंत जाऊन, त्या ओढ्याच्या कडेने ती भूमध्य समुद्रापर्यंत गेली होती. ही त्यांची दक्षिणी सीमा आहे.

  19. त्यांची पूर्वेकडील सीमा यार्देन नदीच्या मुखाकडे असलेल्या मृत समुद्रापर्यंत होती. त्यांच्या उत्तरेकडील सीमेची सुरुवात यार्देनेच्या मुखाशी असलेल्या खाडीपासून झाली,

  20. व पुढे बेथ-होगलाहपर्यंत चढून बेथ-अराबाहच्या उत्तरेकडे रऊबेनाचा पुत्र बोहनच्या खडकापर्यंत गेली.

  21. तिथून ती सीमा आखोर खोर्‍यापासून दबीरपर्यंत जाऊन गिलगालच्या उत्तरेकडे वळली. हे गिलगाल खोर्‍याच्या दक्षिण बाजूस असलेल्या अदुमिम्माच्या चढावांच्या समोरील बाजूस आहे. तिथून त्या सीमेचा विस्तार एन-शेमेशच्या झर्‍यांपासून एन-रोगेलपर्यंत होता.

  22. त्यानंतर ती सीमा हिन्नोमाच्या खोर्‍यातून जाऊन यबूसी नगराच्या (म्हणजे यरुशलेम) दक्षिणेकडील बाजूने गेली. पुढे ती सीमा पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेकडील टोकास असलेल्या पर्वताच्या माथ्यावर जाऊन पोहोचली.

  23. तिथून ती सीमा त्या डोंगराच्या माथ्यापासून नेफतोआहच्या झर्‍यापर्यंत आणि तिथून एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून बालाह म्हणजेच किर्याथ-यआरीमपर्यंत पोहोचते.

  24. तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते.

  25. तिथून ती एक्रोनच्या उत्तरेकडून शिक्रोनपर्यंत गेली व बालाह पर्वतावरून यबनेलास जाऊन पोहोचली. सीमेचा शेवट भूमध्य समुद्राजवळ झाला.