The Tribe Of Judah बद्दल बायबलमधील वचने: Offering of, at dedication
Offering of, at dedication बद्दल वचने
पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षांचा कोकरा;
पापार्पणासाठी एक बोकड;
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.