Nahshon
हे नावानेही ओळखले जाते: Naashon, Naasson
Nahshon चा उल्लेख असलेली वचने
अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.
यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;
पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेने: यहूदाहच्या छावणीच्या दलांनी त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. यहूदाहच्या लोकांचा पुढारी अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा.
पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता.
अम्मीनादाब हा नहशोनचा पिता, नहशोन हा सल्मोन चा पिता,
रामास अम्मीनादाब झाला, आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला.
नहशोनाला सल्मा व सल्माला बवाज हा झाला;
अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता,
तो इशायाचा पुत्र, तो ओबेदाचा पुत्र, तो बवाजाचा पुत्र, तो सल्मोनाचा पुत्र, तो नहशोनाचा पुत्र,