मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय १:१सुमारे इ.स. २६

    अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची ही वंशावळी:

  2. मत्तय १:२सुमारे इ.स. २६

    अब्राहाम इसहाकाचा पिता होता, इसहाक याकोबाचा पिता, याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता,

  3. मत्तय १:३सुमारे इ.स. २६

    यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता,

  4. मत्तय १:४सुमारे इ.स. २६

    अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता,

  5. मत्तय १:५सुमारे इ.स. २६

    सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता,

  6. मत्तय १:६सुमारे इ.स. २६

    इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती,

  7. मत्तय १:७सुमारे इ.स. २६

    शलोमोन रहबामाचा पिता, रहबाम अबीयाचा पिता, अबीया आसाचा पिता,

  8. मत्तय १:८सुमारे इ.स. २६

    आसा यहोशाफाटाचा पिता, यहोशाफाट योरामाचा पिता, योराम उज्जीयाहचा पिता,

  9. मत्तय १:९सुमारे इ.स. २६

    उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता,

  10. मत्तय १:१०सुमारे इ.स. २६

    हिज्कीयाह मनश्शेहचा पिता, मनश्शेह आमोनाचा पिता, आमोन योशीयाहचा,

  11. मत्तय १:११सुमारे इ.स. २६

    योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.

  12. मत्तय १:१२सुमारे इ.स. २६

    बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर: यखन्या शल्तीएलचा पिता, शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता,

  13. मत्तय १:१३सुमारे इ.स. २६

    जरूब्बाबेल अबीहूदचा पिता, अबीहूद एल्याकीमचा पिता, एल्याकीम अज्जूरचा पिता,

  14. मत्तय १:१४सुमारे इ.स. २६

    अज्जूर सादोकाचा पिता, सादोक याखीमचा पिता, याखीम एलीहूदाचा पिता,

  15. मत्तय १:१५सुमारे इ.स. २६

    एलीहूद एलअज़ाराचा पिता, एलअज़ार मत्तानाचा पिता, मत्तान याकोबाचा पिता,

  16. मत्तय १:१६सुमारे इ.स. २६

    याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती.

  17. मत्तय १:१७सुमारे इ.स. २६

    अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.

  18. मत्तय १:१८सुमारे इ.स. २६

    येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा विवाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले.

  19. मत्तय १:१९सुमारे इ.स. २६

    तिचा पती योसेफ हा नीतिमान होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले.

  20. मत्तय १:२०सुमारे इ.स. २६

    परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “दावीदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या गर्भामध्ये जो आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे.

  21. मत्तय १:२१सुमारे इ.स. २६

    ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”

  22. मत्तय १:२२सुमारे इ.स. २६

    प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले.

  23. मत्तय १:२३सुमारे इ.स. २६

    “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).

  24. मत्तय १:२४सुमारे इ.स. २६

    योसेफाने जागा झाल्यावर, प्रभूच्या दूताने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले आणि मरीयेला त्याची पत्नी म्हणून घरी आणले.

  25. मत्तय १:२५सुमारे इ.स. २६

    तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवला नाही. योसेफाने पुत्राचे नाव येशू ठेवले.