Skip to content

Bethany

11 verses

31.7700, 35.2600 गूगल नकाशावर पाहा

Bethany चा उल्लेख असलेली वचने

  1. मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तिथेच केला.

  2. येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते.

  3. ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले,

  4. येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि ते मंदिराच्या अंगणात गेले. त्यांनी सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले, कारण आता उशीर झाला होता, म्हणून आपल्या बारा शिष्यांबरोबर ते बेथानीस गेले.

  5. दुसर्‍या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली.

  6. येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली.

  7. जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ ते आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की:

  8. यानंतर येशूंनी त्यांना बेथानी गावापर्यंत नेले आणि आपले हात वर करून आशीर्वाद दिला.

  9. आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता.

  10. बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते.

  11. वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवसापूर्वी, ज्याला येशूंनी मेलेल्यातून उठविले होते तो लाजर जिथे राहत होता त्या बेथानी गावी येशू आले.