Skip to content

Martha

12 वचने · 3 कुटुंब सदस्य

Martha चा उल्लेख असलेली वचने

  1. येशू आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मार्गाने जात असताना एका नगरात आले तिथे मार्था नावाच्या एका स्त्रीने आपल्या घरी त्यांचे स्वागत केले.

  2. तरी सर्व गोष्टींची तयारी करताना मार्था कंटाळून गेली आणि प्रभूला म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने कामाचा भार माझ्या एकटीवरच टाकला आहे, याची तुम्हाला काळजी नाही काय? तिला मला मदत करावयास सांगा.”

  3. पण प्रभू तिला म्हणाले, “मार्था, मार्था, तू उगाच पुष्कळ गोष्टींची काळजी करीत असते.

  4. आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता.

  5. मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती,

  6. आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.

  7. येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली.

  8. “प्रभूजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.

  9. मार्था म्हणाली, “होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल.”

  10. येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जिथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते.

  11. येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.” मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.”

  12. तिथे त्यांनी येशूंच्या सन्मानार्थ संध्याकाळचे भोजन दिले. मार्था जेवण वाढत होती, त्यावेळी लाजर मेजाभोवती येशूंबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी एक होता.