Lazarus
Lazarus चा उल्लेख असलेली वचने
आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता.
ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते.
मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती,
असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.”
मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे,
हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!”
वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवसापूर्वी, ज्याला येशूंनी मेलेल्यातून उठविले होते तो लाजर जिथे राहत होता त्या बेथानी गावी येशू आले.
तिथे त्यांनी येशूंच्या सन्मानार्थ संध्याकाळचे भोजन दिले. मार्था जेवण वाढत होती, त्यावेळी लाजर मेजाभोवती येशूंबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी एक होता.
तितक्यात येशू तिथे आले आहेत हे कळल्यावर यहूदी लोकांचा समुदाय तिथे आला, तेव्हा केवळ त्यानांच नव्हे तर ज्याला येशूंनी मरणातून उठविले त्या लाजराला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली.
हे पाहून मुख्य याजकांनी लाजराला देखील जिवे मारण्याची योजना केली.
येशूंनी लाजराला कबरेमधून बाहेर बोलाविले व मरणातून उठविले, त्यावेळेस जो लोकसमुदाय तिथे होता त्यांनी वचनाचा प्रचार करणे सुरू ठेवले.