Skip to content

Simon बद्दल बायबलमधील वचने

36 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय?

  2. येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते.

  3. ते त्यांना घेऊन क्रूसावर खिळण्याच्या जागेकडे निघाले. वाटेत त्यांना कुरेने गावचा शिमोन नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.

  4. हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले.

  5. येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली.

  6. कुरेने गावचा एक रहिवासी, आलेक्सांद्र व रूफस यांचा पिता शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.

  7. एका परूश्याने येशूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले व येशूंनी ते स्वीकारले. ते भोजनास बसले असताना,

  8. येशू परूश्याच्या घरी भोजनास गेले आहेत हे ऐकून, त्या नगरातील एक पापी स्त्री मोलवान सुगंधी तेलाने भरलेली एक संगमरवरी कुपी घेऊन तिथे आली.

  9. आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले.

  10. ज्या परूश्याने येशूंना भोजनाचे आमंत्रण दिले होते, त्याने हे पाहिले तेव्हा तो मनाशीच म्हणाला, “यावरूनच येशू संदेष्टा नाहीत हे सिद्ध होते, कारण परमेश्वराने त्यांना खरोखरच पाठविले असते, तर ही स्त्री पापी आहे हे त्यांना समजले असते.”

  11. येशू त्या परूश्याला म्हणाले, “शिमोना, मला तुला काहीतरी सांगावयाचे आहे.” शिमोन म्हणाला, “गुरुजी बोला.”

  12. तेव्हा येशूंनी त्याला एक दाखला सांगितला: “एका सावकाराने दोन माणसांना कर्ज दिले, एकाला चांदीची पाचशे नाणी आणि दुसर्‍याला चांदीची पन्नास नाणी.

  13. परंतु त्यापैकी एकालाही त्याची परतफेड करता आली नाही. तेव्हा त्याने दोघांचेही कर्ज माफ केले. आता या दोघांपैकी कोणाला त्याच्याबद्दल अधिक प्रीती वाटेल?”

  14. “ज्याचे अधिक कर्ज माफ झाले त्याला” शिमोनाने उत्तर दिले. येशू म्हणाले, “तू बरोबर न्याय केला आहेस.”

  15. नंतर ते त्या स्त्रीकडे वळाले आणि शिमोनाला म्हणाले, “तू ही स्त्री पाहिली का? मी तुझ्या घरात आलो. माझे पाय धुण्यासाठी तू मला पाणी दिले नाहीस, परंतु तिने माझे पाय तिच्या अश्रूंनी भिजविले आणि तिच्या केसांनी ते पुसले.

  16. ते येशूंना घेऊन जात असताना, कुरेने गावचा रहिवासी शिमोन नावाचा एक मनुष्य रानातून परत येत होता. त्याला त्यांनी धरले व येशूंचा क्रूसखांब त्याच्यावर ठेवला व त्याला तो येशूंच्या मागोमाग वाहून नेण्यास भाग पाडले.

  17. हे शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदाह याच्यासंबंधात ते बोलले, कारण तो बारा शिष्यांपैकी एक असून त्यांचा विश्वासघात करणार होता.

  18. परंतु येशूंच्या शिष्यांपैकी एकजण, यहूदाह इस्कर्योत जो येशूंचा विश्वासघात करणार होता, त्याने विरोध केला,

  19. संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता.

  20. येशू उत्तरले, “ज्या एकाला मी हा भाकरीचा तुकडा ताटात बुडवून देईल तोच तो आहे.” मग ताटात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्यांनी तो शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतला दिला.

  21. आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे.

  22. म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते.

  23. ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते.

  24. परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला.

  25. शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला.