Simon बद्दल बायबलमधील वचने: 6. A Pharisee, Jesus dines with
6. A Pharisee, Jesus dines with बद्दल वचने
एका परूश्याने येशूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले व येशूंनी ते स्वीकारले. ते भोजनास बसले असताना,
येशू परूश्याच्या घरी भोजनास गेले आहेत हे ऐकून, त्या नगरातील एक पापी स्त्री मोलवान सुगंधी तेलाने भरलेली एक संगमरवरी कुपी घेऊन तिथे आली.
आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले.
ज्या परूश्याने येशूंना भोजनाचे आमंत्रण दिले होते, त्याने हे पाहिले तेव्हा तो मनाशीच म्हणाला, “यावरूनच येशू संदेष्टा नाहीत हे सिद्ध होते, कारण परमेश्वराने त्यांना खरोखरच पाठविले असते, तर ही स्त्री पापी आहे हे त्यांना समजले असते.”
येशू त्या परूश्याला म्हणाले, “शिमोना, मला तुला काहीतरी सांगावयाचे आहे.” शिमोन म्हणाला, “गुरुजी बोला.”
तेव्हा येशूंनी त्याला एक दाखला सांगितला: “एका सावकाराने दोन माणसांना कर्ज दिले, एकाला चांदीची पाचशे नाणी आणि दुसर्याला चांदीची पन्नास नाणी.
परंतु त्यापैकी एकालाही त्याची परतफेड करता आली नाही. तेव्हा त्याने दोघांचेही कर्ज माफ केले. आता या दोघांपैकी कोणाला त्याच्याबद्दल अधिक प्रीती वाटेल?”
“ज्याचे अधिक कर्ज माफ झाले त्याला” शिमोनाने उत्तर दिले. येशू म्हणाले, “तू बरोबर न्याय केला आहेस.”
नंतर ते त्या स्त्रीकडे वळाले आणि शिमोनाला म्हणाले, “तू ही स्त्री पाहिली का? मी तुझ्या घरात आलो. माझे पाय धुण्यासाठी तू मला पाणी दिले नाहीस, परंतु तिने माझे पाय तिच्या अश्रूंनी भिजविले आणि तिच्या केसांनी ते पुसले.